Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 12, 2017

अखेर दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर


पुणे, दि. 12 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे.
तुम्ही दहावीचा निकाल एसएमएसवरही मिळवू शकता. बीएसएनएल ग्राहकांनी MHSSC <स्पेस> <सीट नंबर> आणि 57766 या नंबरवर एसएमएस पाठवू शकता, तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आणि बीएसएनएल नेटवर्क धारकांनी MAH10<स्पेस> <रोल नंबर> टाइप करून 58888111 या नंबरवर एसएमएस पाठवावा.

No comments:

Post a Comment