Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, June 11, 2017

11 काश्मिरी बनले लष्करी ‍‍‍अधिकारी



डेहराड़न- जम्मू- काश्मीरमधील 11 तरुणांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली असून ते लष्करी अधिकारी बनले आहेत. भारतीय लष्करात समावेश होणार्‍या 479 तरुणांमध्ये जम्मू-काश्मीरमधील 11 तरुणांचा समावेश आहे.
 
2016 मध्ये लष्कारात सामील झालेल्या 23 वर्षीय उमर फयाजचे जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अपहरण केले होते व त्यानंतर त्याची हत्या केली होती. फयाज बालापूरमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी या ठिकाणी आला होता. त्यावेळी दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले होते. लष्करात सामील झालेले 11 तरुण फयाज यांना चांगले ओळखत होते. तसेच त्याला आपला रोल मॉडेल मानत होते. ज्यावेळी मी फयाजच्या मृत्यूबद्दल ऐकले तेव्हा माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती. परंतु दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा माझा संकल्प अधिक दृढ झाला.
 
मला घाटीत तैनात व्हायची इच्छा होती व ती आता पूर्ण झाल्याचे काश्मिरी पंडित आशुतोष यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment