Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, June 17, 2017

चालला नामाचा गजर; वैष्णवांच्या मांदियाळीचे माउली मंदिरातून वैभवी प्रस्थान

आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ! दैवताचे नाव सिद्धेश्‍वर !! 
चौर्‍याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा ! हा सुखसोहळा काय वर्णु !!

या संत वचना प्रमाणे अलंकापुरीतील श्रीचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान लाखो भाविकांचे मांदियाळीत हरीनाम गजर करीत श्रीचे वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान सायंकाळी पाऊणे सातच्या सुमारास शनिवारी प्रस्थान ठेवले. श्रीचे पालखीचे मंदिर प्रदक्षिणे दरम्यान हरीनाम गजर अधिकाधिक रंगला. उद्या रविवारी पहाटे सहाच्या सुमारास जुन्या गांधीवाड्यातील आजोळघरातून श्रीचा वैभवी पालखी सोहळा आळंदीकरांचा भावपूर्ण निरोप घेत पुण्यनगरीकडे दोन दिवसांचे (दि.१८ व १९) पाहुणचारातील मुक्कामास वाटचाल करणार आहे.
प्रस्थान सोहळ्यास पुणे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक, प्रमुख विश्‍वस्त योगेश देसाई, लक्ष्मीकांत देशमुख, विकास ढगे पाटील, नरेंद्र वैध्ये, श्रींचे अश्व सेवेचे मानकरी मालक श्रीमंत उर्जितसिह शितोळे सरकार, वणी देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शनजी दहातोंडे, जिल्हाधिकारी सौरव राव, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, व्यवस्थापक आळंदी देवस्थान माउली वीर यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
प्रस्थान सोहळ्यात टाळ, मृदंग, वीणेच्या झन्काराचा त्रिनाद दिसून आला. वरुणराजाचे हुलकावणी दिली तरी भक्तिमय वातावरण हरिनाम गजरात सोहळा चिंब भिजला.भगव्या पताका ,गळ्यात तुळशीमाळ, कपाळी बुक्का अन्‌ मुखाने हरिनामाचा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्याने प्रस्थान दिनी माउली मंदिर आणि तीर्थक्षेत्रासह इंद्रायणी तीर, अलंकापुरी माउली मंदिर प्रांगण दुमदुमून गेले. भक्तीमयी उत्साहात श्रीचे पालखीने अलंकापुरीतून प्रस्थान ठेवताच माउली-माउली असा एकच नामजयघोष झाला. आळंदीकर खांदेकरी युवकांनी माउली-माउली नामजयघोष करीत श्रीची पालखी प्रस्थान दिनी श्रींचे आरतीनंतर आळंदीत खांद्यावर घेऊन नाचवली. चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार,उद्धव चोपदार, व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, प्रांत सुनील गाढे,मुख्याधिकारी समीर भूमकर आदींसह मान्यवर नियोजनास उपस्थित होते.
श्रींचे प्रस्थान सोहळ्यात शनिवारी पाचच्या सुमारास मुख्य सोहळा सुरू झाला. तत्पूर्वी सोहळ्याच्या दिवशी पहाटे चार वाजता घंटानाद, काकडा आरती, पवमान अभिषेक,पंचामृत पूजा,व दुधारती विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते पहाट पूजा झाली.यावर्षीही वणी देवी आळंदी मंदिर माउली देवभेट झाली. याप्रसंगी सप्तशृंगीदेवी गड संस्थानचे व्यवस्थापक सुदर्शनजी दहातोंडे उपस्थित होते.
पहाटे पाच ते सकाळी नऊ या दरम्यान भाविकांच्या महापूजा आणि श्रीचे समाधी दर्शन सुरू करण्यात आले. दुपारी बारा पर्यंत श्रीचे समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहीला. दरम्यान सकाळी नऊ ते अकरा यावेळात विना मंडपात कीर्तन सेवा झाली. दुपारी बारा ते साडेबारा या वेळात श्रीचा गाभारा स्वच्छ करून श्रीचे समाधीस जलाभिषेक, महानैवेध्ये झाला. त्यानंतर दुपारी दोन पर्यंत श्रीचे दर्शनास गाभारा खुला राहिला.
श्रीचे वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी ४७ दिड्यांना मंदिरात प्रवेश देण्यास दुपारी पाऊणे तीनला प्रारंभ झाला. दरम्यान यावेळीच श्रीनां वैभवी पोशाख करण्यास गाभा-यात सुरुवात करण्यात आली. प्रस्थान सोहळ्यातील कार्यक्रमात श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे आरती, त्यानंतर संस्थान तर्फे श्रीची आरती करण्यात आली.मुख्य मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप,दरम्यान विना मंडपातील श्रीचे पालखीत श्रीचे वैभवी चल पादुकांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना वेदमंत्र घोषित झाली. आळंदी देवस्थान तर्फे मानक-यांना पागोटी वाटप परंपरेने झाली. यानंतर श्रीगुरु हैबतरावबाबा यांचे तर्फे दिंडी प्रमुख,प्रतिष्ठित, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर संस्थान तर्फे श्रीचे गाभा-यात नारळ प्रसाद वाटप झाल्यानंतर श्रीचे पालखीतून विना मंडपातून हरिनाम गजरात सोहळ्याने पंढरीस जाण्यास पाऊणे सातच्या सुमारास प्रस्थान ठेवले.
श्रीचे वैभवी पालखीची आळंदीकर खांदेकरी यांनी मंदिर प्रदक्षिणा, ग्राम प्रदक्षिणा झाली. श्रीची पालखी सोहळ्यातील पहिल्या मुक्कामी समाज आरतीने नवीन दर्शन बारी सभागृहातील जुन्या गांधी वाड्याचे जागेत मुक्कामास सोहळा रात्री साडेसातच्या सुमारास विसावला. परिसरातील नागरिक-भाविकांना दर्शन आणि श्रींचे आजोळघरी उत्साहात रात्रीचा जागर होत आहे. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास गांधीवाड्यातील आजोळघरातून श्रीचा वैभवी पालखी सोहळा आळंदीकरांचा भावपूर्ण निरोप घेत पुण्य नगरीकडे वाटचाल करणार आहे.
माऊलींचा सोहळा वाढत असल्याने सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन आणि आळंदी देवस्थान यांनी यावर्षी केला.खांदेकरी भाविक-नागरिकांना मंदिर प्रवेशासाठी मर्यादा आणीत केला गेला. मंदिरात श्रीचे पालखीचे प्रस्थानं दिनी परंपरेने पालखी रथा पुढील २0 व मागील २७ अशा ४७ दिंड्यांना मंदिरात प्रस्थांन सोहळ्यास प्रवेश देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक सुवेझ हक नियंत्रणावर देखरेख ठेवून होते.
पुष्प सजावट पालखी सोहळ्यात श्रीचे पालखी सह रथाची पुष्प सजावट आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २९ वर्षे केली जात आहे. यात सुदीप गरुड, प्रदीप गरुड बंधू नानासाहेबांच्या देखरेखीखाली काम पाहत आहेत. या सेवेचा कोणत्याही प्रकारचा मोबदला, मानधन घेतले जात नाही.केवळ सेवाभाव जोपासत ही विनामूल्य सेवा केली जाते.श्रीची पालखी आळंदीत येई पायऱ्यांत सेवा पुरवली जाते.सेवेसाठी दहा ते बारा कारागीर देखील सेवाभाव जपत पुष्प सजावट करून माउलीचे सोहळ्यात अनुभूती घेतात. विविध रंगी सुगंधीत फुलांचा वापर केला जातो. यात जाई, जुई, मोगरा, लिली, गुलाब, गुलछडीसह विविध रंगीबेरंगी फुलांचा वापर केला जातो.
यावर्षीही आद्य स्वयंभू शक्तीपीठ माता सप्तशृंगी देवी गड वणी कृपाशिर्वाद भेट झाली. श्री. सप्तशृंगी निवासिनी देवी माऊलींची कुलस्वामिनी आहे. या बाबत श्रीचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीत १८ व्या अध्यायात उल्लेख आहे.हा संदर्भ देत यावर्षीही न्यासाचे वतीने व्यवस्थापक सुदर्शनजी दहातोंडे प्रसंगी उपस्थित होते.यावेळी प्रस्थान पूर्वी वणी आणि आळंदी देवस्थान देवभेट घडविली. यासाठी मालक बाळासाहेब आरफळकर यांनी विशेष प्रयत्न केले.

आषाढी पायी वारी प्रस्थानसाठी लाखो वारकरी विना, टाळ-मृदंगाच्या त्रिनादात आणि माउली नामजय घोषात अलंकापुरीत दाखल झाले होते. महिला भाविकांच्या डोईस तुळशी वृंदावन आणि पुरुषांच्या खांद्यावर भगवी पताका आणि खांद्यावरील टाळ, मुखी हरिनाम गजर उत्साहात सुरू होता.भाविकांचे स्वागत अलंकापुरी नगरीत जोरदार करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment