Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, June 13, 2017

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला हातात पकडुन अतिदक्षता विभागात रुग्णसेविका मोबाईल चँटीगं मध्ये दंग, रात्री उशीरा बाळाचा म्रुत्यु.

माणगाव तालुक्यातील दिपाली संतोष दांडेकर याना प्रसुती करीता काही दिवसांपुर्वी आलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काल दि. १२ जुन रोजी प्रसुति दरम्यान सदर महीलेने दोन गोडंस बाळाला जन्म दिला होता. एक बाळ होते १.३ व दुसरे बाळ होते १.७ चे. त्या मुळे कमी वजनामुळे दोही बाळांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
अतिदक्षता विभागात तातडीच्या उपचारा दरम्यान तेथील रुग्ण सेविका सदर बाळाला उपचारा करण्या एवजी मोबाईल मध्ये चँटीगं करताना आढळल्याने पिडीत महीलेच्या नातेवाईकांना अनेक वेळा सदर रुग्ण सेविकेच लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारा दरम्यान अतिदक्षता विभागात कोणासही प्रवेश करण्यास मनाई होती.
अखेर नातेवाईकांनी समाजसेवक रमेश मोरे यांना सदर चा प्रकार फोन वर कळवला. तेव्हा रमेश मोरे यांचाही फोन घेण्यास ड्युटी वरील रुग्णसेविकेने व वैद्यकिय अधिका-यांनी फोन वर बोलण्यास नकार दिला.
अखेर हतबल होवुन नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर रात्री उशीरा सदर बाळ म्रुत घोषित करण्यात आले. व अन्य एक १.७ वजनाचे बाळ सहीत पिडीत महीलेला व नातेवाईकांना रात्री उशीरा पुढील उपचारा करीता मुबंई येथे जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले.
या सदंर्भात आलिबाग जिल्हा रुग्णालयाचे मुख्य सर्जन डाँ गवळी यांच्यांशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी ठाणे येथे महत्वाच्या मिटीगं मध्ये बिझी असल्याने अन्य सिवील सर्जन डाँ फुटाणे यांच्याशी सपंर्क सधण्यास सांगितले. त्यांनी मात्र सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
परंतु एकुणच प्रकार पाहता मुख्य सिवील सर्जन किवां अधीक्षता डाँ फुटाणे यांनी या प्रकरणाला गांभिर्याने न घेतल्याचे समोर येत आहे.

No comments:

Post a Comment