Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, June 2, 2017

शिर्डीत साई मंदिरात भक्तांच्या पावलांतून होणार वीजनिर्मिती, देशात पहिलाच प्रयोग




मुंबई-शिर्डीचे साईबाबा मंदिर लवकरच भक्तांच्या पावलांतून उजळून निघेल. श्री साईबाबा संस्थानने एका खासगी कंपनीच्या सहकार्यातून फूट एनर्जी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत येण्या-जाण्याच्या मार्गात लावल्या जाणाऱ्या उपकरणांवर भक्तांची पावले पडल्यानंतर वीजनिर्मिती होईल. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग होत आहे.

शिर्डी ट्रस्टनुसार या प्रयोगाअंतर्गत मंदिर परिसरातील जवळपास २०० बल्ब व ५० पंखे चालू शकतील एवढी वीजनिर्मिती होईल. मार्गावर ठेवल्या जाणाऱ्या एका पॅडलची किंमत १ लाख रुपये आहे. याचा संपूर्ण खर्च पॅडल स्थापन करणारी कंपनी उचलेल. कंपनी बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर काम करेल. याशिवाय परिसरात गोळा होणाऱ्या कचऱ्यातूनही गॅस व वीजनिर्मिती होईल. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे म्हणाले, हा अनोखा प्रयोग आहे. भक्तमार्गात २०० पॅडल लावले जातील. लोक पुढे पाऊल टाकतील तसे पॅडल दबले जातील व त्यातून वीज तयार होईल. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज ५० हजारांपेक्षा जास्त भाविक शिर्डीत येतात.

दोन महिन्यांत चाचणी होणार:पॅडल लावण्याचे काम सुरू झाले असून दोन महिन्यांत चाचणी सुरू होईल. यातून तयार होणाऱ्या विजेचा उपयोग रांगेत उभ्या भक्तांसाठी वीज व पंखे चालवण्यासाठी होईल. दुसरीकडे, शिर्डीत रोज तयार होणाऱ्या २० टन कचऱ्यापासून गॅस व वीजनिर्मिती केली जाईल. हा प्रकल्प राज्यातील सर्व नगरपालिकातही राबवला जाईल.
गुलाब फुलांपासून अगरबत्ती : दर्शनासाठी येणारे भक्त रोज गुलाबपुष्प व हार वाहतात. रोज जवळपास १ टन गुलाब व हार येतात. ट्रस्ट या फुलांचा वापर करून अगरबत्ती तयार करेल. याची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटांना दिली जाईल.
अशी होईल वीजनिर्मिती
मार्गात लावलेल्या पॅडलमध्ये मोशन सेन्सर आहेत. या उपकरणावर पाऊल पडल्यावर त्याखाली लागलेले फूट एनर्जी कन्व्हर्टर डिव्हाइस फूट इम्पॅक्ट एनर्जीला विजेत रूपांतरित करेल.

No comments:

Post a Comment