तीर्थपुरी-घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खाती उघडून जारी केलेले एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तीर्थपुरी येथील रामेश्वर सिरसाठ व धनंजय कवडे हे दोघे मित्र जायकवाडीच्या डाव्या कालव्याजवळ फिरायला गेले होते. त्याच वेळी त्यांना कालव्याच्या बाजूलाच एसबीआय बँकेचे शेकडो एटीएम कार्ड पाण्यात पडल्याचे दिसून अाले. ग्रामस्थांनी कालव्याकडे धाव घेत आपापले व नातेवाइकांच्या नावाचे कार्ड शोधून घेतले. दरम्यान, तीर्थपुरी येथील एसबीआय बँक शाखेअंतर्गत २५ ते ३० बँक मित्र अाहेत. त्यापैकीच कोणीतरी हे एटीएम कार्ड संबंधित खातेदारांना वाटप न करता कालव्यात फेकून दिले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:
Post a Comment