मुंबई, दि. 29 - जीएसटी लागू व्हायला आता काही तासांचा अवधी उरलेला असताना अनेक बडे व्यापारी आणि रीटेल कंपन्यांनी स्टॉक क्लिकर करण्यासाठी डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत. महागडया वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने जीएसटी लागू होण्याआधीच ग्राहकांची चांदी झाली आहे. बिग बाझार ते अॅमेझॉन सर्वांनीच या ऑफर्स दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची ही एक संधी आहे.
30 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत बिग बाझार उघडे राहणार असून, इथे 22 टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे. ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या फ्लिपकार्टचाही मध्यरात्रीपासून सेल सुरु झाला आहे. फ्लिपकार्टची स्पर्धक असलेल्या अॅमेझॉनवर आधीपासूनच सेल सुरु आहे. अॅमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वापरांच्या वस्तूंवर 40 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे.
आणखी वाचा
जेव्हा तुम्हाला 1 लाख रुपयांचा टीव्ही 60 हजारापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळतो तेव्हा निश्चित खरेदीसाठी ती उत्तम वेळ असते असे एका ग्राहकाने सांगितले. जीएसटी लागू होण्याआधी अनेकांनी टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिगमशिन या महागडया वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.
मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमने नुकतेच ऑनलाइन पेटीएम मॉल सुरु केलाय. तिथेही मागच्या महिन्याच्या तुलनेत ग्राहकसंख्या तीनपटीने वाढल्याचे पेटीएमकडून सांगण्यात आले. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक रोजच्या वापरण्याच्या वस्तू उदाहरणार्थ टूथपेस्ट किंमती कमी होणार आहेत.
वस्तू आणि सेवाकर १ जुलैपासून लागू होत आहे. तत्पूर्वी शिल्लक असलेल्या मालासाठी सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर छप्परफाड ऑफर्सचा वर्षाव होत आहे. हा माल खपवण्यासाठी विविध दुकानदार सुमारे ५० ते ७० टक्के सूट देत आहेत. शहरातील सर्वच इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये तसेच ब्रॅण्डेड वस्तूंच्या दुकानांमध्ये आणि शॉपिंग साईट्सवर माल खपवण्यासाठी सध्या तुफान ऑफर्स दिल्या जात आहेत. ग्राहकदेखील या संधीचा फायदा घेण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी दिलेल्या ऑफरचा ज्यांना फायदा घेणे शक्य आहे, त्यांनी तो जरूर घ्यावा, असे अर्थ क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.

No comments:
Post a Comment