Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 28, 2017

17 मजली बिल्डिंगपेक्षाही उंच होते हे जहाज, 3 फुटबॉल मैदानाएवढी होती लांबी



ब्रिटनमधील प्रवासी जहाज टायटॅनिकवर सर्व काही ठीकठाक होते, ज्याची आपण कल्पना करू शकतो. हे जहाज त्याकाळी जगातील सर्वात मोठे जहाज होते. तसेच ते कधीही बुडू शकणार नाही असेही म्हटले जायचे. मात्र, ते चुकीचे ठरले. 105 वर्षांपूर्वी 10 एप्रिल 1912 रोजी या जहाजाने ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली होती. पण या जहाजाचा हा पहिला आणि अखेरचा प्रवास ठरला. प्रवास सुरू केल्यानंतर चारच दिवसांनी म्हणजे 14 एप्रिलच्या रात्री साडे अकराच्या दरम्यान हे जहाज एका हिमनगाला धडकल्याने अपघातग्रस्त झाले आणि अटलांटिक महासागरात बुडाले होते. ज्यात 1513 लोक बुडून मृत्यूमुखी पडले होते. या जहाजाचा मलबा 75 वर्षानी म्हणजेच 27 जुलै 1987 रोजी आढळून आला होता. 17 मजली बिल्डिंगपेक्षा उंच होते टायटॅनिक....
- हे जहाज इंपिरियल स्टेट बिल्डिंग एवढे उंच होते. इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये असलेल्या टॉवर ब्रिजएवढी याची उंची होती. 
- या जहाजाची शिट्टी सुमारे 11 मैलापर्यंत ऐकू येत होती. त्याची उंची सुमारे 17 मजली इमारतीएवढी होती असे म्हणता येईल. 
- तर त्याची लांबी तीन फुटबॉल मैदानांएवढी होती असे सांगितले जाते. जहाजाच्या प्रवासासाठी रोज 800 टन कोळसा लागायचा.
अशी होती खाण्याची व्यवस्था-
- टायटॅनिकमध्ये प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या खाण्याची बडदास्त होती. 
- त्यासाठी जहाजावर 86,000 पाऊंड मांस, 40000 अंडी, 40 टन बटाटे, 3500 पाऊंड कांदा, 36000 सफरचंद आणि 1000 पावाचे पॅकेट यासाह इतरही सामान होते.
असे होते प्रवासाचे भाडे-
- टायटॅनिक जहाजामध्ये फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी सुमारे शंभर वर्षांपूर्वी 4350 डॉलर (सुमारे 2 लाख 70 हजार रुपये) द्यावे लागले होते. 
- तर सेकंड क्लाससाठी 1750 डॉलर (सुमारे 1 लाख रुपये ) आणि थर्ड क्लाससाठी 30 डॉलर (सुमारे दोन हजार रुपये) द्यावे लागत होते. 
- आजचा विचार करता या जहाजावर प्रवासासाठी 50 लाख रुपये मोजावे लागले असते.

टायटॅनिकमध्ये होते 13 हनिमून कपल-
- या जहाजात 13 नवविवाहित दाम्पत्य हनिमूनसाठी आलेले होते. तसेच यात असेही अनेक जण होते, जे या जहाजात प्रवास करणार नव्हते, पण ऐनवेळी त्यांना या जहाजावरून प्रवास करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 
- कोळशाच्या कमतरतेमुळे प्रवासात अडचणी येत होत्या. त्यामुळे व्हाइट स्टार लाइन जहाजाला प्रवास रद्द कराला लागला. त्या जहाजावरील कोळसा आणि काही प्रवासी टायटॅनिकवर पाठवले होते.

कॅप्टन स्मिथची निवृत्ती अन् अंधश्रद्धा-
- या जहाजाचे कॅप्टन स्मिथ या प्रवासानंतर निवृत्त होण्याची तयारी करत होते. पण हा प्रवास त्यांच्या जीवनातील अखेरचा प्रवास ठरला.
- जहाजामध्ये 900 टन माल होता. रोज 14,000 गॅलन पाणी वापरले जात होते.
- टायटॅनिक जहाजावर 9 कुत्री होती, पण एकही मांजर नव्हती. जहाजावर मांजरी असणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे बाधा दूर होतात, असे म्हणतात. तसेच उंदरांसारखे लहान प्राणी कमी होतात, असेही मानले जाते.
- टायटॅनिक जहाजातून प्रवास सुरू करण्यापूर्वी एक खास प्रथा टाळण्यात आली होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी जहाजाच्या एका खास जागेवर दारुची एक बाटली फोडली जाते. 
- पण टायटॅनिकचा प्रवास सुरू करण्यापूर्वी ही परंपरा पूर्ण केली नव्हती. लोकांच्या मते जर ही परंपरा पाळली गेली असती तर हा अपघात टळू शकला असता.

No comments:

Post a Comment