बुधवारी (26 जुलै) भारताने कारगिल विजय दिवस साजरा केला. ऑपरेशन विजय नावाने राबवलेले हे अभियान भारताने 85 दिवसानंतर यशस्वी केले होते. पाकिस्तान सैनिकांना या कारगिल युद्धासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर- सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय)ने मोठी मदत केली होती. खरं तर आयएसआय ही गुप्तचर संस्था दहशतवादी तयार करण्यापासून ते इतरही अनेक करणांमुळे बदनाम आहे. यात सर्वात मोठा मुद्दा दहशतवादाचा आहे. आयएसआयवर ब-यात काळापासून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप होत आला आहे. ती अनेक घटनांमध्ये सहभागी राहिली आहे. त्याचे उत्तर देणे पाक सरकारला अवघड असते. कारण ती सरकारला न जुमानता लष्कराला जास्त महत्त्व देते. त्यामुळे आयएसआयबाबत पाकिस्तान सरकार हेतूपूर्वक कानडोळा करत असते. अफगाणिस्तानमध्ये जन्माला आले तालिबान...
- 1994 मध्ये पाकिस्तानची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सने (आयएसआयएस) अफगाणिस्तानमध्ये तालिबानला प्रस्थापित केले. या माध्यमातून तिने अफगाणिस्तानमध्ये असा भाग बनवला जो पाकिस्तानला मदत करेल.
अफगाण मुजाहिदीनला पैसे-शस्त्रे :
आयएसआय अफगाण मुजाहिदीनला पैसा व शस्त्रे मोठ्या चलाखीने वाटप करायची. ते सर्व तिला अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी(सीआयए) देत होती.
सोव्हिएत युध्दात मुजाहिदीनची मदत :
आयएसआयने अफगाणिस्तान मध्ये सोव्हिएत संघाच्या विरोधात लढत असलेल्या मुजाहिदीनचा पाठिंबा होता. यातील ब-यात मुजाहिदीनांना दहशतवादी म्हटले जात होते. हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानीने 1980 मध्ये स्वत:ला अमेरिकन समर्थक स्वातंत्र सेनानी म्हणून घोषित केले होते
हज्ब ए इस्लामीला प्रोत्साहन
सीआयएने हज्ब ए इस्लामीचा म्होरक्या गुलाबुद्दीन हिकमतयारला आयएसआयच्या माध्यमातून पैशांचा पुरवठा केला. आज अमेरिका तिची दहशतवाद्यांमध्ये गणना करते.
हक्कानी नेटवर्कला पैशांचा पुरवठा
आयएसआय व हक्कानी नेटवर्कमधील संबंध जग जाहीर आहे. आयएसआय या संघटनेला मोठ्याप्रमाणावर पैशांचा पुरवठा करतात.
अल कायदाला पाठिंबा
9/11 पूर्वी आयएसआय सीआयए सोबत अल कायदाला मदत करत होती. अल कायदानेही अफगाण युध्दात आयएसआयला साथ दिली.
आयएसआय एजंट्स जिवंत पकडले नाही जात
असा दावा केला जातो, की आयएसआयचे एजंट्स जिवंत पकडले जात नाही. मात्र खालिद ख्वाजा व कर्नल इमाम यांना जिवंत पकडले गेले होते. नंतर तहरीक ए तालिबान त्यांची हत्या केली होती.
मुल्ला उमरशी संबंध
दहशतवादी मुल्ला मोहम्मद उमरला आयएसआयने प्रशिक्षण दिले होते, हे जगजाहिर होते. 2009 मध्ये अमेरिका म्हणाली होती, की उमरला आयएसआयची साथ आहे आणि तो कराचीला निघून गेला आहे.










No comments:
Post a Comment