पैठण -नाशकातून गोदापात्रात सोडलेले पाणी शनिवारी दुपारी ३०,१६६ क्युसेक वेगाने जायकवाडीत दाखल होण्यास प्रारंभ झाला. यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याने वाढ झाली. धरणात शुक्रवारी सायंकाळपर्यंत १८.६० टक्के पाणीसाठा झाला. रविवारी गंगापूर धरणातूनही २ हजार क्युसेकने विसर्ग होईल.
वरच्या धरणांतून सुरू आहे विसर्ग
नांदूर-मधमेश्वरमधून २१,३८४ क्युसेक, दारणातून १५,७६९ क्युसेक, वाकी बंधाऱ्यांतून ३,६३७ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
- १५०२.०० फूट (४५७.८१० मी.) जायकवाडीची पाणीपातळी
- ३०१६६ क्युसेक आवक
- ३४.४८४ दलघमी एकूण पाणीसाठा
- ३०१६६ क्युसेक आवक
- ३४.४८४ दलघमी एकूण पाणीसाठा
- ३९६.३७८ दलघमी जिवंत पाणीसाठा
- १८.६०% धरणाची पाणी टक्केवारी
No comments:
Post a Comment