कुटुंबीयांनीच समजुतदारपणाने हलवला मुलीचा पुतळा
कापेर्डीतील (ता. कर्जत) येथील दुर्दैवी मुलीच्या कूटूंबीयांनी आज, शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास, अचानक स्वत: मुलीच्या स्मारकाच्या चौथाऱ्यावर बसवलेला पुतळा काढून घरात ठेवला, त्यामुळे स्मार क की समाधी या वादावर आता पडदा पडला आहे.
कोपर्डी येथे भय्यूजी महाराज यांनी दुर्दैवी मुलीचे स्मारक उभे केले होते, मात्र त्यावर मुलीचा पुतळा बसवण्यापुर्वीच संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा स्मारकास विरोध केला होता, मात्र असे असतानाच दि. १३ जुलैला मध्यरात्री त्या स्मारकावर मुलीचा पुतळा कूटूंबीयांनी बसवला होता.
हे समजताच काल, शुक्रवारी दुस-या दिवशी वातावरण तणाव निर्माण झाल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पुतळा कापडाने झाकून टाकला. पुतळा उभा केल्याचे वृत्त समजातच विविध संघटनाच्या भुमिकांच्या पाश्र्वभुमिवर पुतळयाच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाद वाढत असल्याचे लक्षात आल्याने मुलीच्या कूटूंबीयांनी आज, शनिवारी दुपारी, पुढाकार घेत बसवलेला पुतळा काढून घेतला. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुरुवारी मुलीच्या वर्षेश्राध्द निमित्ताने पुतळा बसवण्याची आमची इच्छा होती, त्यानुसार आम्ही परिवाराने त्याच दिवशी रात्री पुतळा बसवला. मात्र भय्यूजी महाराजांवर झालेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो आहोत. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी, असाच भय्यूजी महाराजांचा प्रयत्न असतो.
परंतु या घटनेमुळे समाजाचे स्वास्थ बिघडू नये, यामुळे आम्ही पुतळा काढून घरामध्ये आज ठेवला. यापुढे याप्रकरणी कोणीही कोणावरही या प्रश्नावरून टिका करू नये.
समजुतदारपणाबद्दल आभार
संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेशाध्यक्ष मतीन आकरे, शिवांनद भानुसे, राजेश परकाळे व टिळक भोस यांनी सांगितले की, संभाजी बिग्रेड मुलीच्या कूटूंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तिला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहोत. ताईचे स्मारक उभा करण्यामुळे समाजात तेढ निर्माण झाली असती. तसेच आमच्या ताईची विटंबना झाली असती. प्रशासन व कूटूंबीयांनी पुतळा काढून जो समजुदारपणा दाखवला त्याबद्दल संघटना अभारी आहे.
No comments:
Post a Comment