Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 25, 2017


हे फोटोज उत्तर कोरियातील हायवे एम 25 वर घेतले आहेत. हाय वे इतका रूंद आहे की, एखाद्या मोठ्या विमानतळाची धावपट्टीच वाटतेय. सोबतच येथे एकही कार तुम्हाला दिसणार नाही. मात्र, येथे लोक नेहमीप्रमाणेच फरफटीचे जीवन जगताना दिसतेय, जे हुकुमशहाच्या बंधने आणि दिखाव्यापेक्षा वेगळी आहेत. हे फोटोज या वर्षी उत्तर कोरिया दौ-यावर गेलेल्या फ्रेंच फोटोग्राफर एरिक लफ्फॉर्जने टिपले आहेत. डेली लाईफ पाहायची मिळाली संधी...
- एरिकने सांगितले की, उत्तर कोरियातील या हायवेचे प्रवास अनेक अंगानी खूपच अनोखा ठरतो. 
- यानिमित्ताने येथील लोकांचे रोजचे आयुष्य पाहायला मिळाले, ज्यावर राजधानी प्योंगयांगचे कोणतेही नियत्रंण नाही.
- हायवे पूर्णपणे मोकळा आहे आणि तेथून छोटे छोटे रस्त्यांना हा हायवे जोडला गेला आहे. 
- एरिकच्या म्हणण्यानुसार, कार, गाड्या नसलेला हा हायवे भुतासारखा भासतो. हा हायवे विमानतळासारखा दिसतो. 
- मात्र, या हायवेचा शेप खूपच बिघडला आहे. हायवेवर ठिकठिकाणी चढ-उतार आणि खड्डेच खड्डे दिसत आहेत.
हायवेवर दिसली अमेरिकन हमर कार-
- एरिकने सांगितले की, उत्तर कोरियात जाताना तुम्हाला खूप नियोजन करावे लागते. हायवेवर टॉयलेट करायला थांबणेही धोकादायक ठरू शकते. 
- तुम्हाला हायवेनी जाताना काही दुकाने लागतात. रस्त्यावर ठिकठिकाणी हुकुमशहाचे कौतूक व प्रचार करणारी पोस्टर्स वाचायला मिळतात. 
- तेथील दुकानात सस्ता सोजू (राईस एल्कोहल) सुद्धा खरेदी केली जाऊ शकते. जेथे लोक एनर्जी ड्रिंक रेड बुलप्रमाणे पितात. मात्र, त्याचे काही वाईट परिणाम पाहायला मिळतात. 
- एरिकने तेथील हायवेवर अमेरिकन हमर पाहल्याचा दावा केला. त्याने सांगितले की, ही कार कोणा उच्च पदस्थ अधिका-याची होती.
- तेथे सामान्य लोकांना कार खरेदी करण्याची परवानगी नाही. तेथे फक्त सरकारी अधिकारीच कार खरेदी करू शकतात.
अमेरिकन हल्ल्यापासून वाचण्यासाठी तयारी-

- फोटोग्राफरने तेथे हायवेच्या कडेला लावलेले दगडाचे पिलर्स पाहिले. एरिकच्या माहितीनुसार, हे अमेरिकेच्या संभाव्य हल्ले रोखण्याबरोबरच रस्ते ब्लॉक करण्यासाठी ठेवले आहेत. 
- एरिकने सांगितले की, तेथील एका गार्डने देशात गरजेपेक्षा जास्त बंधने असल्याने सरकारवर टीका केली.
- एरिकने सांगितले की, ही पहिलीच घटना आहे जेव्हा एखाद्या सामान्य नागरिकाने जाहीर सरकारवर टीका केली.

No comments:

Post a Comment