Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 25, 2017

या देशात वेश्‍याव्यवसायावर बंदी, तरीही रात्रभर चालतात असे उद्योग


थायलंडची सेक्स इंडस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाच्या पर्यटन मंत्री कोबकर्ण वोत्तानवरंगकुल यांना हा उद्योग लवकरच बंद करायचा आहे. या अंतर्गत जूनमध्‍ये बँकॉकच्या काही मोठ्या वेश्‍यागृहांवर पोलिसांनी धाड टाकली. यात 100 पेक्षा जास्त सेक्स वर्कर्संना अटक झाली. मात्र वेश्‍या व्यवसायातील लोकांच्या म्हणण्‍यानुसार थायलंडच्या पर्यटन उद्योगावर याचा मोठा परिणाम होईल. बेकायदेशीर असूनही जोरात आहे वेश्‍याव्यवसाय...
- गेल्या 70 वर्षांपासून थायलंडमध्ये वेश्‍याव्यवसाय बेकायदेशीर आहे. तरीही याला आग्नेगय आशियातील सेक्स टुरिझमचे केंद्र मानले जाते.
- पटाया येथील मुख्‍य सेक्स टुरिझम केंद्र आहे. येथे एक हजारापेक्षा जास्त बार व मसाज पार्लर आहेत. यांच्या आड मोठ्या प्रमाणावर वेश्‍याव्यवसायाचे रॅकेट चालवले जात आहे. 
- एसआयव्ही आणि एड्सवर काम करणारी संस्था अॅव्हर्टनुसार थायलंडमध्‍ये 1 लाख 23 हजारांपेक्षा जास्त सेक्स वर्कर्स आहेत. 
- दुसरीकडे काळ्या बाजारावर लक्ष ठेवून असलेल्या हॅवोकस्कोपनुसार, येथे 2 लाख 50 हजार लोक वेश्‍याव्यवसायात गुंतले आहेत. मात्र हे आकडे आणखी जास्त असू शकतात. 
- येथील एका दिवसाची कमाल रोजंदारी 570 रुपये आहे. रस्त्यावर वेश्‍याव्यवसाय करणारे सेक्स वर्कर्स ए‍का दिवसात 220 रुपये कमावू शकतात. उच्चभ्रू ग्राहकाकडून ते 5 हजार 700 रुपयांपर्यंत कमावू शकतात. 
- थायलंडच्या देशांतर्गत विकास दरात पर्यटन उद्योगाचे योगदान 10 टक्के आहे.

वेश्‍यांसाठी पर्यटन येत नाहीत - पर्यटन मंत्री

- पर्यटन मंत्री कोबकर्ण म्हणतात, आम्हाला थायलंडचे पर्यटन स्वच्छ ठेवायचे आहे. आम्ही सेक्स इंडस्ट्री बंद करणार आहोत. पर्यटक यासाठी येथे येत नाहीत. ते आमचे सुंदर संस्कृती पाहण्‍यासाठी येतात.

शेजारील देश इंडोनेशियातही वेश्‍याव्यवसाया विरोधात लढा-

- मुस्लिम देश इंडोनेशियाने 2019 पर्यंत सर्व ब्रॉथल्स बंद करण्‍याचे लक्ष्‍य ठेवले आहे. 
- गेल्या महिन्यात राजधानी जकार्तामधील शेकडो ब्रॉथल्स तोडले गेले. 
- इंडोनेशियात वेश्‍याव्यवसायावर प्रत्येक महिन्यात 615 कोटी रुपये खर्च केले जातात. अशा स्थितीत ब्रॉथल्स तोडल्याने देशाची अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. 
- इंडोनेशियात 1 लाख 40 हजारांपासून 2 लाख 30 हजार वेश्‍या आहेत. त्यांना लोअर, मिडल, अप्पर आणि एलिट क्लास असे वर्गीकरण केले आहे. 
- येथे सेक्स सेक्टरचे आर्थ‍िक वाटा 8 हजार कोटींपासून 22 हजार कोटी रुपयांदरम्यान आहे.

जगभरात वेश्‍याव्यवसायावर खर्च होते 12 लाख 44 हजार 627 कोटी रुपये-

चीन 4 लाख 87 हजार कोटी रु.
स्पेन एक लाख 76 हजार कोटी रु.
जपान एक लाख 60 हजार कोटी रु.
जर्मनी एक लाख 20 हजार कोटी रु. (लीगल इंडस्ट्री)
अमेरिका 97 हजार कोटी रु.
दक्षिण कोरिया 80 हजार कोटी रु.
भारत 56 हजार कोटी रु
थायलंड 42 हजार कोटी रु.
फिलीपीन्स 40 हजार कोटी रु.
तुर्कस्तान 26 हजार कोटी रु.

जगभरात एकूण 13 कोटी 82 लाख 8 हजार 700 वेश्‍या-

चीन 5 मिलियन
भारत 3 मिलियन
अमेरिका 1 मिलियन
फिलीपींस 800,000
मेक्सिको 500,000
जर्मनी 400,000
ब्राझील 250,000
थायलँड 250,000
बांग्लादेश 200,000
दक्षिण कोरिया 147,000

No comments:

Post a Comment