Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

गुजरातच्या समुद्रकिनारी 3500 कोटींचं ड्रग्ज केलं जप्त


मुंबई, दि. 30 - भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या समुद्र किनारी  तब्बल 3500 कोटींचं ड्रग्ज पकडले आहे. जहाजमार्गे होणाऱ्या मोठ्या ड्रग्ज तस्करीचा डाव उधळून लावण्यात यश आले आहे. या ड्रग्जची किंमत तब्बल 3 हजार 500 कोटी एवढी आहे. एमव्ही हेनरी या जहाजात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडले.
तीन दिवसांपूर्वी गुप्तचर संघटनेकडून भारतीय नौदलाला या जहाजासंबंधी माहिती मिळाली होती. या जहाजमार्गे मुंबईत ड्रग्ज येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर 3 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर कोस्टगार्डनं हे जहाज शोधलं आणि त्याच्यावर छापा मारला.  समुद्रात पकडलं गेलेला आतापर्यंतचा हा सर्वाधिक ड्रग्जचा साठा आहे. ही कारवाई आतापर्यंत देशातील सर्वात मोठी कारवाई मानली जातं आहे.
एमव्ही हेनरी हे जहाज पकडल्यानंतर त्याला  गुजरातच्या पोरबंदर पोर्टवर नेण्यात आले आहे. या जहाजात आठ ते 10 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळतेय. 

No comments:

Post a Comment