Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

नांदेडमधील मृत शेतकर्‍याच्या वारसांना ५ लाखाची मदत : मुख्यमंत्री


नांदेड : प्रतिनिधीकुवरचंद मंडले 
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे (वय ३५) यांचे किनी येथे पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरत असतांना शनिवार २९ जुलै रोजी निधन झाले. त्यानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाच्या संपर्कानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत शेतकरी रामा पोतरे यांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. 
याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. याबरोबरच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने रामा पोतरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
भोकर तालुक्यातील दिवशी बु येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोतरे हे स्टेट बँक ऑफ इंडिया किनी येथील शाखेत पीक विमा योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी रांगेत उभे होते. शनिवार २९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अचानक चक्कर येऊन पडले. त्यांच्यावर किनी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणत असताना रस्त्यामध्ये त्यांचे निधन झाले. रामा पोतरे यांना आई, वडील, पत्‍नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment