Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 25, 2017

घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळली; 9 जणांचा मृत्यू, 20 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता


मुंबई-घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमाजवळ साईदर्शन ही 4 मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका तीन महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. व्ही. रेणुका ठक असे तिचे नाव आहे. रंजनबेन शहा (वय 62) या वृध्देचा आणि एका 80 महिलेचा मृत्यू झाला आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची माहिती दिली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी बचावकार्य करत आहे.
आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांना बाहेर काढले
या इमारतीच्या ठिगाऱ्याखाली 20 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत एकूण 12 कुटुंब होती. इमारतीचा स्लॅब कोसळल्याने कुटुंब अडकली आहेत. सध्या सर्च कॅमेऱ्याने अडकलेल्यांचा शोध सुरु आहे. वर्षा सकपाळ (वय 20), गीता रामचंदाणी (वय 58), विठ्ठल शिरगिरी (वय 35) हे जखमी झाले आहेत. ही इमारत बेकायदेशीर नव्हती मात्र नर्सिग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती, असे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केले. हे नर्सिग होम शिवसेनेचे सुनील शितप यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबत आपल्या काही माहिती नसल्याचे सांगितले. तर बीएमसी अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचे कारण लगेच निश्चित सांगता येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आहेत.
विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल
सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही इमारत कोसळली. ही इमारत 30 ते 40 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर सितप नर्सिग होम होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही कुटंब राहत होती. तळ मजल्यावर असणाऱ्या नर्सिग होमचे नुतनीकरण सुरू होते. रहिवाशांनी विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले होते. त्यामुळे पीलर्सला धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी काहींनी विनापरवाना वैयक्तिक कार्यालयंही काढली होती, असे सांगण्यात येत आहे. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी 8 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment