Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 25, 2017

प्रेमीयुगुलाची निर्घृण हत्या; मदत सोडून रक्तरंजीत घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले गावकरी


मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील एका गावात प्रेमीयुगुलाची निर्घृण हत्या झाली. तरुणीच्या भावानेही हे निर्घृण कृत्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना तिच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. भावना शून्य गावकरी आपल्या मोबाइलमध्ये या रक्तरंजीत घटनेचा व्हिडिओ टिपण्यात मग्न होते.

प्रेमसंबंधाला होता भावाचा विरोध...
- नांदेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, थेरबन गावात राहाणारी पूजा हिच्या मनाविरुद्ध दीड महिन्यापूर्वी जेठीबा वर्षावार या तरुणासोबत विवाह झाला होता.
- पूजाचे गोविंद नामक तरुणावर प्रेम होते. विवाह झाल्यानंतरही दोघे एकमेकांना भेटत होते.
- काही दिवसांपूर्वी दोघे घरून पळून गेले होते. दोघे तेलंगणात राहिल्यानंतर नांदेडला परत आले होते. याबाबत पूजाचा भाऊ आणि आरोपीि दिगंबर असाने याला समजले. त्याने रविवारी दोघांना पत्ता मिळवला. त्याने सुरुवातीला पूजा हिला बळजबरीने घरी नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने त्याला विरोध केला असता दिगंबरने धारदार शस्त्राने तिच्यावर अनेक वार केले.
- बहिणीला वार केल्यानंतर दिगंबरने तिचा प्रियकर गोविंदला भररस्त्यावर भोसकले.

तरुणी रक्ताच्या थारोळ्यात अन् गावकरी बनवत राहिले व्हिडिओ...
- भर रस्त्यावर दिगंबर याने पूजा आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. परंतु गावातील एकही जण त्यांना मदतीसाठी पुढे आला नाही. पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली असताना गावकरी मात्र मोबाइलमध्ये तिचा व्हिडिओ बनवत होते.
- नंतर आरोपी दिगंबर हा स्वत:ला पोलिसांना शरण गेला.

No comments:

Post a Comment