Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 28, 2017

राज्यसभा निवडणूक : अमित शहा, स्मृती इराणींनी भरला अर्ज, काँग्रेसचे 6 MLA फुटले

अहमदाबाद - गुजरात राज्यसभा निवडणुकीसाठी अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या आणखी तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. गुरुवारी तीन आमदारांनी राजीनामा दिला होता, त्या पाठोपाठ आणखी तीन आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सहा आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग अवघड झाला आहे.
पटेलांना विजयासाठी 46 मतांची गरज...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी विधानसभा सभापती रमनलाल व्होरा यांनी सांगितले की काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. 
- जामनगर ग्रामीणचे आमदार राघव सिंह पटेल म्हणाले, की आगामी निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढणार नाही. भाजप जेव्हा सांगेल तेव्हा राजीनामा देऊ. 
- गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीनंतर आता काँग्रेस आमदार अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग अवघड झाला आहे. 
- पटेल यांना विजयसाठी 46 आमदारांची गरज आहे. सध्याच्या घडीला गुजरात विधानसभेत काँग्रेसकडे 54 आमदार आहेत, मात्र अंतर्गत कलहामुळे या सर्वच आमदारांचे मत पटेलांच्या खात्यात पडेल याची शाश्वती नाही. दुसरे असे, की नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते.

No comments:

Post a Comment