Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 28, 2017

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय


इस्लामाबाद-पनामा पेपर लीकप्रकरणी दोषी ठरवत नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे. नवाज शरीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नवाज यांच्यासह मुलगी आणि जावई यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. संपत्तीचा स्त्रोत सांगण्यात शरीफ अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या नेतृत्वाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. नवाज यांचे बंधू शहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता आहे. सध्या शहबाज पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. संयुक्त तपास पथकाच्या अहवालात हा आरोप योग्य असल्याचे सिध्द झाले होते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानेही आता शरीफ यांना दोषी ठरवले आहे.
पनामा पेपर्स म्हणजे नेमके काय
पनामा येथील एका लॉ फर्मने काही गोपनीय कागदपत्रे लीक केली होती. त्यामुळे बडे राजकारणी, अतिश्रीमंत लोक आपल्याकडील काळेपैसे कसे सुरक्षित ठेवतात हे समोर आले होते. जगभरातील शोध पत्रकार यावर काम करत होते. 128 राजकारणी आणि काही देशांच्या प्रमुखांची नावे पनामा पेपर्समध्ये आहेत.

No comments:

Post a Comment