श्रीनगर -जम्मू आणि काश्मिरातील गांदरबल जिल्ह्यात एका चेकपोस्टवर लष्करी जवानांनी घुसून पोलिस जवानांना मारहाण केली. यात 7 पोलिस जखमी झाले असून संबंधित सैनिकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लष्करी जवानांनी चेकपोस्टमध्ये घुसून मालमत्तेचे देखील नुकसान केले. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांच्या पासिंगची वेळ संपल्यानंतर सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या सैनिकांचे वाहन पोलिसांनी थांबवले होते. त्यावर संतप्त सैनिकांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून पोलिसांवर हल्ला केला.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी वाहनाला सोनामार्ग चेकपोस्टवर पोलिसांनी थांबवले. या वाहनात बसलेले लष्करी जवान साध्या वेशात होते. अमरनाथ यात्री आणि नागरिकांच्या पासिंगची वेळ संपली असे पोलिसांनी त्यांना सांगून मागे हटण्यास सांगितले. मात्र, वाहने थांबली नाहीत. तसेच गांदरबलच्या दिशेने रवाना झाली.
- यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी पुढील चेकपोस्टच्या पोलिसांना वाहनांची माहिती दिली. त्यावेळी गुंड येथील चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यांनीही पासिंगची वेळ संपल्याचे सांगितले. एवढेच नव्हे, तर सुरक्षेच्या कारणास्तव वेळ पूर्ण झाल्यानंतर जाणारी वाहने थांबवण्याचे कठोर निर्देश असल्याची माहिती सुद्धा दिली.

इतर सैनिकांनाही फोन करून बोलावले
- वाहने थांबवली तेव्हा संतप्त झालेल्या लष्करी जवानांनी 24 राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि चेक पोस्टवर तैनात सर्वच पोलिसांना बेदम मारहाण केली.
- एवढेच नव्हे, तर गुंड पोलिस चौकीत घुसून सैनिकांनी कथितरीत्या तोडफोड आणि कागदपत्रे फाडून फेकली आहेत. तसेच अडवणाऱ्या पोलिसांना सुद्धा हाणामारी केली.
- या घटनेत जखमी झालेल्या 7 पोलिसांना उपचारासाठी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय रायफल्स च्या जवानांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment