Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, July 15, 2017

भारतीय विद्यार्थी अमेरिकेत असुरक्षित!


शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
अमेरिकेत भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या अनेक घटना ताज्या असतानाच तेथील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुरक्षिततेबाबत चिंतेचा स्वर उमटला आहे. अनेक विद्यार्थ्यांना अमेरिकेत असुरक्षित वाटत असल्याचे, एका सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे.
इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनने (आयआयई) याबाबत सर्वेक्षण केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा मुस्लीम बहुसंख्य असलेल्या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातल्याचे दडपण अनेक मुलांवर दिसून येत असल्याचे आयआयईने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निणर्याचे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते समर्थन केले आहे.
उच्चशिक्षण घेण्यासाठी लाखो विद्यार्थी अमेरिकेत येतात. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे मोठे योगदान आहे. प्रवेशबंदीनंतर मध्यपूर्व देश व भारतातील विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक सुरक्षिततेबाबत चिंता दिसून आली.
मध्यपूर्व देशातील विद्यार्थी प्रवेशासाठी येणार नाहीत असे ३१ टक्के शैक्षणिक संस्थांना वाटते, तर भारतातील विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येणार नाहीत असे २० टक्के संस्थांना वाटते. ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे संस्थांनी म्हटले आहे.
व्हिसा तयार करण्यात अडचणी
नव्या नियमामुळे मध्यपूर्व देशातील विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे. ८० टक्के संस्थांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ४६ टक्के संस्थांना विद्यार्थ्यांचा व्हिसा तयार करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. ११२ महाविद्यालयांच्या अहवालानुसार, गतवर्षांच्या तुलनेत यावर्षी विद्यार्थ्यांच्या येण्याच्या संख्येत २ टक्क्यांनी घट झाली आहे.

No comments:

Post a Comment