सेऊल- उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्र आयसीबीएमची दुसऱ्यांदा यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी घेतली. आता या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण अमेरिकेतील सर्व मुख्य भूभागांना लक्ष्य करणे शक्य होऊ शकते, असा धडकी भरवणारा दावा हुकूमशहा किम जाँग उन यांनी शनिवारी केला.
लॉस एंजिलिस आणि शिकागोसह अमेरिकेतील बहुतांश प्रदेश आता उत्तर कोरियाच्या टप्प्यात आल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. हवासाँग-१४ क्षेपणास्त्राने ३ हजार ७२५ किलोमीटरची उंची गाठली आणि जपानच्या समुद्रात ते कोसळण्यापूर्वी ९९८ किलोमीटरचे अंतर त्याने पूर्ण केले. हे क्षेपणास्त्र मोठ्या आकाराचे आणि अवजड आण्विक शस्त्रांना वाहून नेण्यास सक्षम आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला धोकादायक असल्याचे म्हटले आहे. आता या चाचणीच्या घटनेसाठी रशिया, चीन जबाबदार ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे उत्तर कोरियाच्या चाचणीवर चीनने टीका करत सर्व देशांनी संयम राखण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment