बीजिंग : भारत व चीन यांच्यात डोकलामवरून चाललेल्या वादाबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी संसदेत केलेले निवेदन पूर्णपणे खोटे असल्याचा आरोप करण्याचे औद्धत्य चीनने पुन्हा दाखविले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये सुषमा स्वराज यांना खोटे ठरविताना, चीनने आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अशी धमकीही भारताला दिली आहे.
एवढेच नव्हे, तर डोकलाममधून भारताने सैन्य मागे न घेतल्यास त्याचे परिणाम त्या देशाला भोगावे लागतील, अशी उघड धमकीही चीनने दिली
आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारताच्या सिक्किमच्या सीमेवर असलेल्या भुतानच्या डोकलाम भागात चीनच्या मुजोरीबद्दल राज्यसभेत निवेदन केले
होते. या निवेदनामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. चीनने ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात म्हटले आहे की, डोकलाम प्रश्नाबाबत आम्ही (चीनने) आतापर्यंत खूपच संयम दाखविला आहे. आमच्या संयमाचा भारताने अंत पाहू नये, अशी धमकीही दिली आहे. डोकलाम हा भाग आमचाच आहे आणि त्या भागातून आम्ही आमचे सैन्य मागे घेणार नाही, असा इशाराही चीनने भारताला दिला आहे. भारतानेच डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घ्यावे, असे सांगतानाच, तसे न केल्यास त्याचे परिणाम भारताला भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली आहे.
सरकारच्या मर्जीनेच...
चीनमधील प्रसिद्धिमाध्यमे सरकारच्या मालकीची असून, त्यातून सातत्याने भारतावर आरोप केले जात आहेत व भारताला धमक्याही दिल्या जात आहेत. तो मजकूर कोणाना कोणा लेखकाच्या नावाने प्रसिद्ध केला जात असला तरी ती चीन सरकारचीच भूमिका आहे

No comments:
Post a Comment