लग्न करणारे दोघे व त्यांचे कुटुंबीय यांना ते संस्मरणीय ठरावे, असे वाटते. पण एका ब्रिटिश जोडप्याने थेट अंटार्क्टिकावर जाऊन लग्न केले. ज्युली बाऊम आणि टॉम सिल्व्हेस्टर असे या जोडप्याचे नाव असून तब्बल ११ वर्षे त्यांची मैत्री सुरू होती. तापमान गोठणबिंदुच्याही खाली गेलेले असताना झालेल्या या लग्नाला २० जण उपस्थित होते. नवविवाहित जोडप्याला गिर्यारोहणाचा मोठा अनुभव आहे. ते गिर्यारोहकांना शिकवतात. बाऊम या योक्साल (स्टॅफोर्डशायर) येथील असून त्या म्हणाल्या की, अंटार्क्टिकावरच आमचे लग्न होणार होते, असे आता वाटते. अंटार्क्टिकासारखे स्थळ कुठे नाही. येथील बर्फाळ डोंगर मला खूप आवडतात. खूप छान लोकांसोबत अशाच आश्चर्यकारक ठिकाणी वेळ घालवणेही मला आवडते. स्टेशनवर असलेल्या काही महिलांच्या मदतीने बाऊम यांनी स्वत:चा ड्रेस तयार केला व स्वत:साठी असलेल्या जुन्या नारंगी रंगाच्या पिरामिडच्या आकाराच्या तंबूत तो शिवला. शिफिल्डचे राहणारे सिल्व्हेस्टर म्हणाले की, आम्हाला लग्नाचा छोटा खासगी समारंभ व्हावा, असे नेहमीच वाटायचे. परंतु पृथ्वीवरील खूप खूप दूरच्या ठिकाणी लग्न होईल याची कल्पनाही केली नव्हती. ब्रिटिश अंटार्क्टिक टेरिटरी विवाह कायदा २०१६ मध्ये सुधारण्यात आल्यापासून झालेले हे पहिलेच शुभमंगल. अंटार्क्टिकावर लग्न करणे सोपे जावे यासाठी या कायद्यात सुधारणा केल्या गेल्या.
Saturday, July 22, 2017
११ वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी केले अंटारर्क्टिकावर लग्न

Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment