मुंबई, दि.20- महिलांच्या तस्करीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून त्याला रोख लावण्यासाठी आता ठोस प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला तस्करीची कीड मुळापासून मिटवण्यावर चर्चा करण्यासाठी प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन जुहू येथे २७ व २८ जुलै रोजी केल्याचेही त्यांनी सांगितले.
रहाटकर म्हणाल्या की, महिला तस्करी नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सचिवांपासून प्रत्येक राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्ष परिषदेत सामील होतील. याशिवाय २० देशांतील सुमारे १०० प्रतिनिधी परिषदेत विचार विनिमय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात ब्राजील, केनिया, घाना, फिलीपाईन्स अशा विविध देशांतील मानवी तस्करी विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांचा समावेश असेल. सुमारे ३०० अतिमहत्त्वाच्या व्यक्ति या परिषदेत उपस्थित असतील.
देशात १७०० रेड लाईट एरिया असून सुमारे ३० हजार महिलांना नाईलाजास्तव देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे गंभीर वास्तवही रहातकर यांनी समोर मांडले. त्या म्हणाल्या की, पश्चिम बंगालसह बांग्लादेश घाना, रशिया यांमधून मोठ्या प्रमाणात महिलांची तस्करी होत आहे. महाराष्ट्रात सुमारे १० हजार महिलांची तस्करी होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तरी अल्पवयीन
मुलींच्या देहव्यापारात मुंबई देशात दुसऱ्या क्रमांकावर
देशाची व्यापाराची राजधानी असलेली मुंबई देह व्यापारातही देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. तरी महिला तस्करीमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण घटल्याचेही त्यांनी सांगितले.
शेट्ये प्रकरणाची चौकशी वेगाने
भायखळा तुरूंगातील महिला कैदी मंजुळा शेट्ये प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयोगाने एसआयटी नेमली असून आत्तापर्यंत त्याच्या तीन बैठका झाल्या आहेत. तपास वेगाने सुरू असून कैद्यांना मिळणाऱ्या आरोग्य आणि सेवा सुविधांचा प्रत्यक्षदर्शी अहवाल समिती देईल, असं विजया रहाटकर म्हणाल्या आहेत.

No comments:
Post a Comment