काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा विश्वासशंकररावांवरील भक्ती, आमची युक्ती अन् नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय शक्ती या त्रिसूत्रीच्या बळावर नांदेड मनपाच्या आगामी निवडणुकीत पक्षाची सत्ता कायम राखण्याचा मनोदय प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मर्यादा उघड करत त्यांनी कोणालाही प्रभारी केले तरी आम्ही त्यांना भारी ठरू, असा विश्वासही चव्हाण यांनी स्पष्ट केला.
येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात जिल्हा व शहर पदाधिकारी निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या बठकीत खासदार चव्हाण बोलत होते. या वेळी पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी शकील अख्तर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोिवदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सरचिटणीस बी. आर. कदम, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकत्रे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment