Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, July 17, 2017

हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे अमनदीप सिंह. स्टिल मॅन म्हणून त्यांची ओेळख आहे


हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे अमनदीप सिंह. स्टिल मॅन म्हणून त्यांची ओेळख आहे. अमनदीप सिंह यांच्या अनेक कसरतींना गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांच्या मजबूत शरीरावरुन कार जाते तेव्हा उपस्थित लोक आश्चर्यचकीत होतात. पण, अमनदीप सिंह यांना ते आता सवयीचे झाले आहे. हाताने बॉटले फोडण्याचे प्रकार त्यांच्यासाठी हातचा मळ आहे. एकावेळी २० दुचाकी ते रोखून धरु शकतात. सामान्य माणूस ज्या गोष्टी करण्याचा विचारही करु शकत नाही त्या गोष्टी ते अगदी सहज करतात. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर घरची जबाबदारी आहे. त्यांची एक गिफ्ट शॉपी आहे. २००६ पासून ते बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी आतापर्यंत ३००० लोकांना मार्शल आर्टसची ट्रेनिंग दिली आहे.

No comments:

Post a Comment