Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, July 17, 2017

निरोध, चिकटटेप लावूनही डीझेल गळती काही थांबेना; अखेर ट्यूब पट्ट्या बंधल्या अन् बस धावली



बीड / औरंगाबाद -अंबाजोगाई बसस्थानक येथून शनिवारी ३.३० वा. बस औरंगाबादकडे निघाली. नंदुरफाटा येथे महामंडळाच्या बसमधील प्रवासी उतरत असताना काहींनी चालकाला डीझेल गळती होत असल्याचे सांगितले. चालकांनी प्रसंगावधान लक्षात घेत बस सुरू करून हायवेच्या बाजुस घेतली. इंजिनवरील कव्हर काढून तपासण्यास प्रारंभ केला. तेव्हा डिझेलपाईप लिकेज असल्याचे निर्दशनास आले. लिकेज बंद करण्यासाठी चालकांनी तब्बल पाऊन तास वेग-वेगळ्या शक्कल लढवल्या. त्यामुळे, प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती.
चालकांनी फाटा परिसरात गॅरेज पाहिले. परंतू मेडीकल दिसून आले. त्यांनी चक्क निरोध आणि चिकट टेपचा वापर करून पाऊन तास डीझेल गळती थांबवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान वाहक यांनी काही अंतरावर जाऊन सायकल मार्ट येथून ट्यूबच्या पट्या आणल्या. त्यानंतर चालक व वाहक दोघांनी मेकॅनिकच्या भूमिकेत जाऊन डीझेल गळतीच्या पाईप दुरूस्त केला. तब्बल पाऊन तास शर्यतीचे प्रयत्न करून बसची डिझेल गळती बंद करून बस पुन्हा सुरू झाली.

No comments:

Post a Comment