अत्यंत अवघड असलेली अमरनाथ यात्रा ययशस्वीरीत्या पूर्ण
करून धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 72 यात्रेकरूंचे रविवार
दि. 16 जुले रोजी देवगिरी एक्सप्रेने सकाळी 8ः30 वाजता नांदेड येथे आगमन झाले
असुन यात्रेकरूंचे स्वागत करण्यासाठी विविध संघटनांचे पदाधिका-यांनी रेल्वे
स्थानकावर उपस्थित होते
सोळयाव्या अमरनाथ यात्रेत यात्रेकरूंनी अमरनाथ, वैष्णोदेवी, शिवखोडी, दिल्ली,
अमृतसर, वाघा बाॅर्डर या धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. दहा
राज्यातून सात हजार कि.मी.पेक्षा जास्त अंतराचा प्रवास पंधरा दिवसात पूर्ण
केला.
या यात्रेत कृष्णा कदम, मनोज शर्मा, कवी राजेंद्र मालवीय, स्वाती कुलकर्णी,
अरूणा केसकर, राधेय कच्छवे, नवनाथ सोनवणे, नागेश शेटटी, सरदार
जागीरसिंघ, भास्कर रायपत्रेवार, कमलाकर केसकर, विजयसिंह बिसेन, व्यंकटेश
वाकोडीकर सविता सोनवणे, राजेंद्र दायमा, प्रदीप शुक्ला, अजयसिंह ठाकूर,
चद्रकांत कदम, चरणजितसिंघ अरोरा, राजींदर सहदेव,बाळासाहेब कच्छवे,प्रसाद तातोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अत्यंत बिकट असलेली अॅड. दिलीप ठाकूर यांच्या योग्य नियोजनामुळे यात्रेकरूंना कोणताही त्रास झाला नाही.सुखरूपणे नांदेडला सर्व यात्रेकरू परत आल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईक व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment