दि. 16 जुलै 2017 रोजी नांदेड येथे प्रमुख कार्याकत्यांच्या झालेल्या बैठकित चर्चेतून खालील ठराव संमत करण्यात आले.
ठराव क्र.1. मागील सलग तीन वर्षाचा दुष्काळ, नापीकी व सरकारी धोणामुळे शेती मालाला मिळालेल्या कमी भावामुळे राज्यातील शेतकरी-शेतमजूर आर्थिक संकटात
आल्याने व सर्वसाधारण जीवन जगणे सुश्किल झाने तो आत्महत्येचा माग स्विकारीत आहे कधी नव्हे. अशा उद्भवलेल्या कठिण परिस्थिसतीत सरकारची जबाबदारी म्हणून
सन 2017 पर्यंतचे कोणत्याही अटी, शर्ती, निकष व लावता शेतकÚयांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी.
ठराव क्र.2 शेतीमालाला योग्य हमी भाव मिळावा यासाठी वैधनिक असलेली यंत्रणा उभी करुन शेती व्यवसायाला सुध्दा नफा मिळावा यासाठीचे धोरण अंमलात आणून
सरकारने खरेदी व्यवस्थेचा उपयशी व्यापार करण्याऐवजी प्रसंगी हमी भावापेक्षा बाजार भाव कमी झाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकÚयांना देण्यात यावी.
ठराव क्र.3 राज्यात इतर व्यवसयिक (उद्योजक,व्यापारी,कारखानदार) इत्यादीना त्यंच्या तारण (गहाण) वस्तूच्या मुल्यांकनाच्या 70 टक्के प्रमाणात बॅंका कर्ज देताता.
त्याप्रमाणे शेतकÚयांना सुध्दा जमिनीच्या मुल्यांकनाच्या (रेडी रेकनेर) च्या 70 टक्के कर्ज देण्यात यावे.
ठराव क्र. 4 देशात अन्न सुरक्षा, जिवन सुरक्षा,महत्वाच्या व्यक्तीना सुरक्षा एवढेच नाहीतर काही प्राण्यांना सुध्दा कायाद्याने सुरक्षा दिली जाते. शेतकरी-शेतमजुर कष्ट
करुन अन्न धान्याच्या निर्मितीतून सर्वांचे पोषक करतो. त्यामुळे त्यांनाही सर्वार्थाने सुरक्षेचा अधिकार मिळावा यासाठी शेतकरी-शेतकजुरांना आर्थिक, सामाजिक सुरक्षा
कायदा करुन त्यांचे उत्पन्न किमान चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाÚयां इतके सुरक्षित करावे.
ठराव क्र.5 कामाची हमी ही सरकारची जबाबदारी असल्याने यापुढे तरुणांना काम मिळेपर्यंत किमान जिवना आवश्यक गरजा भागविण्यासाठी मानधन देण्यात यावे.
किसान संचाची ही बैठक वरील ठरावाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करते की, दि. 30 सप्टेंबर 2017 पुर्वी या मागण्यांची पुर्तता करावी. अन्यथा राज्यातील शेतकरी,
शेतमजूर, यूवकांच्यावतीने 02 आॅक्टोबर 2017 पासून सरकारच्या विरोधार अहकार आंदोलन सुरु करण्यात येईल असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.
आंदोलनाच्या व वरील मागण्याच्या शेतकरी -शेतमजुर, माहिती व प्रचार व्हावा यासाठी दिनांक 9 आॅगस्ट (क्रांती दिन) ते 2 आॅक्टोबर पर्यत राज्यातील 25 जिल्हातून
शेतकरी - शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येईल यामध्ये प्रत्येक जिल्हात किमान 50 जाहीर सभेचे आयोजन केले जाईल अशी माहिती निमंत्रक श्री शंकर अण्णा धोंडगे
यांनी दिली
नांदेड
सरकारने कुठल्याही अटी शर्ती व निकष न लावता शेतकरी-शेतमजूरांची व शेती व्यवसायकांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी सर्व शेती उत्पादनांला कायद्याने योग्य भावाची
हमी द्यावी. जमिनीच्या बाजारभाव इतका कर्जपूरवठा करावा. शेतकरी-शेतकजूराला कायद्याने आर्थिक, सामाजिक सूरक्षा द्यावी. तरुणांना काम मिळेपर्यत मानधन
द्यावे अन्यथा 2 आॅक्टोबर पासुन शेतकरी सरकारच्या विरोधात असहकाराचे आंदोलन करतील असी घोषणा दि. 16 जुलै रोजी नांदेड येथे झालेल्या
किसान मंचच्या बैठकीत शेतकरी नेते मा. शंकर अण्णा धोंडगे यांनी केली.
या बाबत सविस्तर वृत असे की, शेतकÚयांच्या असंतोषातुन महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थीती नंतर सरकार व सुकाणू समितीच्या निर्णयातुन झालेल्या कर्जमाफीमूळे
शेतकरी समाजात नाराजीचे व संभ्रमाचे वातावरण असुन महराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील अनेक जेष्ठ व अग्रणी नेत्यांना सुध्दा मान्य नाही या बैठकीपूर्वी अश्या
जेष्ठ नेत्यांच्या औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत याबाबतीत निटनेटकेपणे शेतकÚयांचे प्रश्न सोडविण्यासाठी किसान मंचची स्थापणा करण्यात येवून मंचाच्या कार्यसमितीच्या
वतीने मा. शंकरअण्णा धोंडगे यांनी किसान मंचचे निमंत्रक म्हणून काम पाहावे असे ठरले त्यांनत नाशीक, अमरावती येथे विभागीय बैठकाही झाल्या जिल्हया जिल्हयाच्या
बैठकीचे सत्र सुरु असुन आज नांदेड जिल्हयाची बैठक शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व किसान मंचचे समन्वयक श्री सिताराम मोरे यानी हि बैठक बोलावली होती.
बैठकिला अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मा. शंकरअण्णा धोंडगे यांनी सरकारकडे वरिल मागण्या केल्या. सरकारने 2 आॅक्टोबर पूर्वी या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा
शेतकरी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करतील असे सरकारला सुचविले केंद्राच्या व राज्याच्या सरकारचे धोरण शेतकÚयांच्या विरोधाचे असुन यांना अद्योगपत्यांचे,
व्यवसायीकांचे 16 लाख कोठी रु. एन.पि.ए. च्या व दिवाळखोरीच्या आधारने राईट आॅफ करता येतात तर सर्वाचे पोषण करनाÚया शेतकÚयांचे संपूर्ण कर्जमुक्ती
साठी सर्वानी जात,धर्म प्रसंगी पक्षही बाजूला ठेवीत सर्व शेतकरी नेत्यानी व शेतकÚयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यानी केले हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी
ही 9 आॅगस्ट सेवाग्राम ते 2 आॅक्टोबर नाशीक असे 60 दिवसाचे शेतकरी- शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येईल की ज्या अंतर्गत दोन हजार गावात
शेतकरी शेतमजूरांच्या सभा आयोजीत केला जावून त्याचा समारोप नाशीकच्या शेतकरी मेळाव्यात 2 आॅक्टोबर रोजी करण्यात येईल याबैठकीला.... दत्ता पवार
अशोकराव लोंढे, विठठल जाधव,हनमंत मिनके, दत्तराव सुकळकर, विश्वाभर मसलगेकर सदाशिल पाटील, प्रभाकर आढाव, बाबुराव केद्रे, बाबासाहेब देशमुख, दत्ता करांमुगे,
तुकाराम मोरे, व्यंकटराव माने, गौतम पवार, देशमुख, दत्ता तळणीकर, संजय वडवळे, कार्यक्रमाचे संचलन दिलीप धोंडगे यांनी केले.
No comments:
Post a Comment