Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

नवाझ शरीफ यांचे लहान भाऊ शाहबाज होणार पाकचे पंतप्रधान; अब्बासी तूर्त काळजीवाहू


इस्लामाबाद- पाक सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर नवाझ शरीफ लहान भाऊ शाहबाजकडे पंतप्रधानपदाची खुर्ची सोपवतील. ६५ वर्षीय शाहबाज पंजाबचे मुख्यमंत्री आहेत.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, शाहबाज खासदार होईपर्यंत शाहीद खाकन अब्बासी यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. नवाझ सरकारमध्ये ते पेट्रोलियम मंत्री होते.
नवाझ यांच्या अध्यक्षतेखालील पीएमएल-एनच्या बैठकीत अब्बासींची निवड झाली. मात्र, त्याची औपचारिक घोषणा अद्याप झाली नाही. अब्बासी ४५ दिवस काळजीवाहू पंतप्रधान राहतील,असे सांगण्यात येते. यादरम्यान शाहबाज नॅशनल असेंब्लीची निवडणूक लढवतील.
आर्थिक कॉरिडॉरवर परिणाम नाही : चीन
नवाझ यांचे पद जाण्याने महत्त्वाकांक्षी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवर परिणाम होणार नसल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री लू कंग यांनी म्हटले आहे. पनामा पेपर्स लीकमध्ये नवाझ पायउतार हाेणे ही त्यांची अंतर्गत बाब आहे. चीन व पाकच्या मैत्रीवर परिणाम होणार नाही.

No comments:

Post a Comment