लंडन- हे छायाचित्र सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ऑक्सफर्ड सर्कल परिसरात बनवण्यात आलेल्या “स्मार्ट स्ट्रीट’चे आहे. या रस्त्याला ‘बर्ड स्ट्रीट’ या नावानेही ओळखले जाते. हा जगातील पहिला स्मार्ट रस्ता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रस्त्यावर लोकांच्या चालण्यातून वीजनिर्मिती होणार असल्याचा दावा हा रस्ता बनवणारी कंपनी “पेव्हजेन’ने केला आहे.
यावर लावण्यात आलेली विशिष्ट टाइल्स पायांमधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे विजेत रूपांतरण करते. या विजेच्या माध्यमातून सायंकाळी या परिसरात दिवे लागतात. या स्ट्रीटवरील वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शहरातील प्रदूषित हवेला शुद्ध करणारे ‘एअरलॅब फिल्टर’ लावण्यात आलेले आहेत. प्रदूषण कमी करण्यास मदत करणाऱ्या रंगांचाही वापर येथे करण्यात आला आहे. या स्ट्रीटवर चालणाऱ्या ग्राहकांना येथील दुकानदारांनी सवलतीचे कुपनदेखील दिले असल्याचे कंपनीने सांगितले.
क्लीन एअर बेंच
एअरलॅबच्या वतीने लावण्यात आलेले क्लीन एअर बेंच हवेचे शुद्धीकरण करते. यात लावण्यात आलेले फॅन दूषित कार्बन आणि नायट्रोजन कण ९५ टक्क्यांपर्यंत कमी करतात. त्यामुळे या खुर्चीवर बसणाऱ्यांना ताजीहवा मिळते


No comments:
Post a Comment