Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 21, 2017

परीक्षार्थींवर राहणार करडी नजर



पुणे, दि. 21 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दि. २२ जुलै रोजी होत असून या परीक्षेलाही नीट, जेईईप्रमाणे वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. पेपरफुटी टाळण्यासाठी परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्यापुर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात पोहचावे लागणार आहे. तसेच परिषदेमार्फतच पेनही दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक परीक्षा कक्ष व परीक्षार्थींचे चित्रीकरण केले जाणार आहे.
राज्यात सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनानुदानित, कायम विनानुदानित या शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी ह्यटीईटीह्ण (महाटेट) ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परिषदेमार्फत राज्यात एकूण १ हजार १८ परीक्षा केंद्रावर ह्यटीईटीह्ण ही परीक्षा होणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक व इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर दोन असे स्वतंत्र पेपर असतील. पेपर एकची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी एक, तर पेपर दोन दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होणार आहे. पेपर एकसाठी मराठी, इंग्रजी, उर्दू या सर्व माध्यमांसाठी १ लाख ६९ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी तर पेपर दोनसाठी एकुण १ लाख २७ हजार ५३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकुण २ लाख ९७ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
परिषदेमार्फत यंदा परीक्षेसाठी काही महत्वपुर्ण बदल करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांपुर्वी झालेली पेपरफुटी टाळण्याच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार आहे. नीट, जेईई यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेप्रमाणे आता टीईटीलाही वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात, तर पेपर सुरू होण्यापूर्वी २० मिनिटे आधी परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेला बसु दिले जाणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरू झाल्यानंतरही ३० मिनिटापर्यंत परीक्षार्थींना प्रवेश दिला जात होता. मागील वर्षीपर्यंत परीक्षार्थींना स्वत:चा बॉलपेन वापरण्यास परवानगी दिली जात होती. यंदा मात्र परिषदेमार्फतच पेन दिला जाणार आहे.
प्रत्येक परीक्षा केंद्रात सर्व प्रक्रियेचे चित्रीकरणही केले जाणार नाही. परीक्षा केंद्रात परीक्षार्थी दाखल होण्यापासून, प्रश्नपत्रिकांचे सील काढणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप अशा सर्व बाबींचे चित्रीकरण केले जाणार आहे. तसेच यावर्षी पहिल्यांदाच प्रश्नपत्रिकांचे चार संच असतील. परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थींप्रमाणेच केंद्रसंचालक, पर्यवेक्षक तसेच इतरांनाही मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वप्रकारे दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी सांगितले.
शुल्क भरूनही परीक्षेपासून वंचित
यंदा टीईटीचे शुल्क केवळ आॅनलाईन प्रक्रियेद्वारे भरता येणार होते. काही विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शुल्क भरूनही ते परिषदेला मिळाले नसल्याचा प्रकार घडला आहे. प्रवेशपत्र न मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी परिषदेकडे याबाबत विचारणा केली असता हा प्रकार समोर आला. याबाबत परिषदेने हात वर केले असून शुल्क न मिळाल्याने संबंधितांना परिक्षेला बसता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शुल्क भरूनही परिक्षेपासून वंचित राहावे लागणार आहे.
यावर्षी झालेले बदल
- प्रवेशपत्रासोबत इतर छायाचित्र असलेले ओळखपत्र बंधनकारक
- परीक्षा केंद्रात अर्धा तास आधीच पोहचावे लागणार
- प्रश्नपत्रिका चार संचात असणार
- परीक्षार्थींना केंद्रातच बॉलपेन दिला जाणार
- केंद्रात परीक्षार्थींसह इतरांनाही मोबाईलवर बंदी
- सर्व केंद्रांवर चित्रीकरण होणार

No comments:

Post a Comment