कालाहंडी- ओदिशातील कालाहंडी येथे एका गर्भवती महिलेस तिच्या नातेवाइकांन १६ किमी दूर अंतर वाट कापत कावडीतून न्यावे लागले. पावसामुळे रस्त्यात एक झाड कोसळले. त्यामुळे या भागात रुग्णवाहिका येऊ शकली नाही. त्या महिलेची प्रकृती गंभीर बनली होती.
तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयात नेण्यासाठी बांबू वापरले. गर्भवती महिलेस त्या बांबूच्या झोळीत बसवून १६ किमी दूर अंतर कापत वाटचाल केली. तेथे रुग्णवाहिका उभी होती. त्या रुग्णवाहिकेतून तिला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. आई आणि मुलगी दोघांचीही प्रकृती चांगली आहे. काही दिवसापूर्वी या गावात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका गर्भवती महिलेस स्ट्रेचरवरून रुग्णालयात न्यावे लागले होते. परंतु मूल गर्भातच मरण पावले होते.
कनेक्टिव्हिटी नादुरूस्त असल्याने अडचण : आम्ही सर्व सुविधा ठेवल्या आहेत. परंतु दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची सुविधा नसल्यामुळे लाेकांपर्यंत पोहचण्यास आमची अडचण होते. असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment