नवी दिल्ली - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. ते माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांची जागा घेणार आहेत. सोनी यांनी नुकताच आपल्या प्रभारी पदाचा राजीनामा देऊन जबाबदाऱ्यांपासून मुक्त करण्याची मागणी केली होती.
काँग्रेस सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपली हिमाचल प्रदेशातील टीम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, माजी केंद्रीय मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांना हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि बिहारचे खासदार रंजीत रंजन यांना चिटणीस करण्यात आले आहे. आरोग्याच्या कारणास्तव अंबिका सोनी यांनी आपल्याला जबाबदाऱ्यांपासून मुक्त करावे अशी मागणी केली होती. त्यांची मागणी पक्षाकडून मंजूर करण्यात आली आहे. तरीही त्या जम्मू आणि काश्मिरच्या प्रभारी म्हणून कार्यरत असतील असेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment