Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 18, 2017

मोहीम फत्ते: अबू सईदच्या मृत्यूनंतर इसिस-केचा शक्तिपात, पुन्हा संघटन अशक्य, अमेरिकेचा दावा



वॉशिंग्टन-अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी गट इस्लामिक स्टेट खोरासनचा (आयएसआयएस-के) म्होरक्या अबू सईद ठार झाला होता. त्यानंतर आता आयएसआयएस-केची शक्ती कमी झाली असल्याचा दावा पेंटागॉनने केला आहे. अफगाणिस्तानात या दहशतवादी गटाचे संघटन कमजोर पडल्याचे पेंटागॉनचे म्हणणे आहे. आयएसआयएस-केचे अनेक सदस्य अफगाणिस्तानात विविध ठिकाणी लपून असल्याचेही पेंटागॉनने म्हटले आहे.

पेंटागॉनचे प्रवक्ते नौदल कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी सांगितले की, अफगाणिस्तानात १ हजारपेक्षा अधिक दहशतवादी असतील असे वाटत नाही. नंगेर प्रांतावर आपला ताबा आहे. तेथे दहशतवादी असल्याचा दावा जेफ यांनी केला. मात्र त्यांची सर्व शक्ती आता आत्मसंरक्षणासाठी खर्ची पडेल, असा अंदाज पेंटागॉनने वर्तवला. अबू सईदचा खात्मा हा अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवाईतील सर्वात मोठा विजय असल्याचे डेव्हिस म्हणाले. आता पुन्हा तेथे दहशतवादी गटाची बांधणी करणे कठीण आहे. एका वर्षात तिसऱ्यांदा अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात आयएसआयएस-के गटातील प्रमुख नेता मारला गेला. तीन म्होरक्यांना ठार करण्यात अमेरिकी फौजांना यश आल्याचे डेव्हिस म्हणाले.
 युद्धाभ्यासांना चीन समुद्रात आवर घाला
अमेरिकी संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने पूर्व आणि दक्षिण चीन समुद्रात युद्धाभ्यास करत असलेल्या देशांना संयम राखण्याचा आदेश दिला आहे. प्रक्षोभक कारवायांपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला. पेंटागॉनचे प्रवक्ते जेफ डेव्हिस यांनी म्हटले की, या क्षेत्रातील सर्व देशांना आम्ही आग्रहाची विनंती करतो. त्यांनी कवायतींना आवर घालावा. परस्परांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखणे गरजेचे असून चीनच्या एच-६ बॉमर्सच्या उड्डाणावरही त्यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, जपानने या युद्धाभ्यासाची सवय करून घ्यावी, असे चीनने म्हटले आहे. चिनी प्रवक्ता शेन जिंके यांनी बॉमर्सची चाचणी बाशी खाडीत घेतल्याचे जाहीर केले.

No comments:

Post a Comment