Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 18, 2017

ISIS च्या तळावरून या स्थितीत दोन मुलांची सुटका, मांस खाऊन राहिली जीवंत



मोसूल- इराकमधील मोसुल येथे वेगवेगळ्या ठिकाणी ढिगाऱ्यात दबलेल्या दोन मुलांना वाचवण्यात आले. त्यांच्या रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक त्यांच्याजवळ गेले. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार, ही मुले इसिस दहशतवाद्यांची असून ते मूळची रशियाची आहेत. त्यापैकी एक मुलगा जिवंत राहण्यासाठी कच्चे मांस खात होता. ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत राहिले नसावे, असे गृहीत धरून या जागी सात दिवसांपूर्वी बचाव मोहीम थांबवण्यात आली होती. आत्मघातकी हल्ल्यात मारले गेले आई-वडिल...
- सुरक्षा यंत्रणांच्या अधिका-यांनी सांगितले की, मलब्यात रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आल्यानंतर आम्ही तेथे पोहचलो.
- त्यावेळी ही मुले व्याकूळ अवस्थेत पडलेली होती. त्यांना खायला आणि प्यायला काहीही मिळत नव्हते.
- सुरक्षायंत्रणांनी दावा केला की, ही मुले इसिससाठी लढलेल्या दहशतवाद्याची आहेत. बोलण्यावरून ही मुलगी रशियाची वाटत आहे. रशियन भाषा बोलत आहेत.
- मुलगी अमिनाचे म्हणणे आहे की, ‘माझे आई-वडील आत्मघाती बॉम्बहल्ल्यात ठार झाले होते.’ 
- दरम्यान, त्यांची स्थिती पाहून दोघांनाही तत्काळ पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात दाखल करण्यात आले आहे.
- मागील आठवड्यात ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत राहिले नसावे, असे गृहीत धरून या जागी बचाव मोहीम थांबवण्यात आली होती. येथे इसिसच्या दहशतवाद्यांचा तळ होता.

No comments:

Post a Comment