Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, July 26, 2017

अमेरिकन तरूणी पडली भारतीय तरूणाच्या प्रेमात, मग सासरचे बदलले नशिब



खरा साथीदार तोच असतो जो कठिण परिस्थितीतही आपल्या पार्टनरची साथ सोडत नाही. यातीलच एक अमेरिकेत राहणारी जेनिफर सुद्धा आहे. जिला फेसबुकवर एक गुजराती तरूण भेटला आणि त्यांच्यात प्रेम झाले. पुढे भारतात येऊन जेनिफरने मयंकसोबत लग्न केले. त्याच्या लग्नाला आता चार वर्षे झाली आहेत. जेनिफर अमेरिकेत, तर, मयंक गुजरातमध्ये राहतो. असे असूनही जेनिफर नेहमी गुजरातमध्ये पतीला भेटायला येते. तसेच मयंकच्या गरिब परिवाराला आर्थिक मदत करते. असे पडले मयंक आणि जेनिफर प्रेमात....
- गुजरातमधील बोरसद शहरात राहणारा मयंक लखलाणीने वर्ष 2012 मध्ये जेनिफरला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. 
- यानंतर दोघांत नेहमीच चॅटिंग व बोलणे होऊ लागले. या दरम्यान मयंकने जेनिफरला प्रपोज केले आणि जेनिफरने त्याचे प्रपोजल स्वीकारले. 
- काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी, 2013 मध्ये जेनिफर बोरसद येथे आली आणि भारतीय रिती-रिवाजांनुसार लग्न झाले.
मयंकच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत...
- फक्त 10 वीपर्यंत शिकलेला मयंक एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. लग्नानंतर जेनिफर अमेरिकेत परत गेली. 
- या दरम्यान वडिलांच्या ऑपरेशनमुळे मयंकला नोकरी सोडावी लागली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी बिघडली. 
- जेव्हा जेनिफरला ही माहिती मिळाली तेव्हा तिने मयांकच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे पाठवले. याशिवाय तिने मयंकला कार सुद्धा घेऊन दिली. 
- मयंकने हे सांगून कार घेण्यास नकार दिला की त्याला कार चालवायला येत नाही. मात्र, तिने कार शिकायला वेगळे मयंकला 800 डॉलर पाठवले.
सासरच्या मदतीसाठी आपली कार सुद्धा विकली-
- यानंतर काही महिन्यांनी बाईक चालवताना मयंकचा अपघात झाला. यात त्याचे हाता-पायाला फ्रॅक्चर झाले. यामुळे त्याला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. 
- मयंकच्या उपचारासाठी त्याच्या वडिलांना आपले घर विकावे लागले. त्यामुळे मयंकच्या कुटुंबाला भाड्याच्या घरात राहावे लागले. याशिवाय मयंकचे पिता आजारी पडले. 
- मयंकला रूग्णालयात दाखल केल्यानंतर पैशांची चणचण भासली. अशावेळी जेनिफर मयंक आणि त्याच्या वडिलांची देखभाल करण्यासाठी गुजरातमध्ये आली. 
- मयंकला जेव्हा रक्ताची गरज होती तेव्हा जेनिफरने आपले रक्त सुद्धा दान केले. जेनिफरने सुमारे वर्षभर मयंकसोबत राहिली व संपूर्ण कुटुंबांची देखभाल केली. 
- मात्र, या दरम्यान अमेरिकेतून भारतात राहिल्याने जेनिफरची अमेरिकेतील नोकरी गेली. जेनिफरने मयंकच्या परिवाराला मदत करण्यासाठी आपली कार सुद्धा विकली. 
- सर्व पैसे संपल्यावर ती पुन्हा 2015 मध्ये परत अमेरिकेत गेली. तेथे नवी नोकरी शोधली. अशा कठिण स्थितीतही तिने मयंकची साथ सोडली नाही. ती आता तीन-चार महिन्याला मयंकला भेटायला अमेरिकेतून गुजरातमध्ये येते. 
- जेनिफरच्या मदतीमुळे मयंक आणि त्याच्या कुटुंबांची स्थिती सुधारली आहे. तर मयंक सुद्धा अपघातातून सावल्यानंतर दुसरी नोकरी शोधली.

No comments:

Post a Comment