Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


केरळ, दि.30 - केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात  शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हल्ला करण्यात आला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले आहेत. तसेच, हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांच्या शोध सुरु आहे. 
दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला आहे. याचबरोबर या हत्येचा निषेध म्हणून राज्यभर आज हरताळ पुकारला आहे. तर, सीपीआय-एमने कुमानम राजशेखरन यांनी केलेला आरोप फेटावून लावला आहे. शहर पोलीस आयुक्त स्परजंन कुमार यांना सांगितले की, हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शहरात पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment