गेल्या मे महिन्यात सनी लिओनी एका जिमच्या उदघाटनासाठी लातुरात आली होती त्यावेळी तिचा पति डैनियल देखील तिच्या सोबत होता , सनीला तिच्या पतिसोबत पाहुन अनेकांनी तर्क वितर्क लावले , मात्र आता त्या सर्व चर्चेला पूर्ण विराम मिळालाय ! कारण सनी फक्त जिमच्या उदघाटना साठीच आली नव्हती तर ती एका 21 महिन्याच्या मुलीला पाहण्यासाठी देखील आली होती ! उदगीर तालुक्यातल्या संधी निकेतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शिशु गृह उदगीर येथे असलेली 21 महिन्यांची निशा नावाची मुलगी सनीला पसंत पडली होती ! त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर 15 जुलै रोजी सनी आणि डैनियल हे दोघे उदगीरला आले आणि निशा ला घेऊन मुंबईला गेले ! आणि अश्या प्रकारे सनीला आई बनन्याची संधि मिळाली !
कोन आहे निशा ?
15 ऑक्टोम्बर 2015 रोजी एका नवजात शिशुला उदगीरच्या शिशु गृहात आनन्यात आले ! मुलीच्या खऱ्या आईला त्या मुलीचा संभाळ करने शक्य नसल्याने तिने मुलीला शिशु गृहाच्या स्वाधीन केले ! त्यानंतर या शिशु गृहातच तिचे निशा हे नाव ठेवण्यात आले ! मातेला नको असलेल्या निशाला आता हक्काची आई मिळाली आहे ! त्यामुळे निशाचे भवितव्य आता उज्ज्वल बनलेय !
कस शोधलं निशाला सनीने ?
मूल दत्तक घेण्यासाठी कारा (cara) नावाच्या अधिकृत वेबसाईट वर नाव नोंदणी सनीने केली , त्यानंतर उपलब्ध असलेल्या मुलांचे फोटो सनीला पाठवन्यात आले , त्यानंतर पसंत असलेल्या मुलीची भेट घेण्यात आली , व कायदेशीर प्रक्रिये नंतर सनीला हे मूल सोपविन्यात आले !
प्रतिनिधी -आसिफ पटेल लातूर
....................................................................................................................................................................
व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी लिंक वर
ताज्या बातमी साठी YOUTUBE वर namaskar maharstra वर subcrib करा
No comments:
Post a Comment