Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, July 20, 2017

बाजारातून गायब होत आहेत २००० रूपयांच्या नोटा; बँका, ग्राहक त्रस्त


गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय बाजारपेठेत २००० रूपयांच्या नोटांची कमतरता भासत असल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार बँक आणि एटीएममध्ये पैसे भरण्याची सुविधा पुरवणाऱ्या कंपन्याही यामुळे हैराण आहेत. गेल्या काही दिवसांपासून २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून कमी झाल्याचा बँक आणि एटीएम सेवा देणाऱ्या कंपन्यांनी दावा केला आहे. रिझर्व्ह बँकही (आरबीआय) २ हजार रूपयांच्या नोटांचा कमी पुरवठा करत असल्याचे वृत्त माध्यमांत आहे. सरकार जाणूनबुजून २ हजार रूपयांच्या नोटांचा कमी पुरवठा करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरबीआयकडून ५०० रूपयांच्या नोटांचा मोठ्याप्रमाणात पुरवठा केला जात असल्याचे स्टेट बँकेचे सीओओ व्यास यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला सांगितले. सुरूवातीला पुरवण्यात आलेल्या २ हजारच्या नोटाच सध्या बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे व्यास यांनी म्हटले. देशात एकूण २.२ लाख एटीएम आहेत. त्यापैकी ५८ हजार एटीएम हे एसबीआयचे आहेत. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. नोटाबंदीनंतर ५०० आणि २००० रूपयांच्या नवा नोटा देण्यासाठीची रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया एसबीआयने सर्वात वेगाने पूर्ण केली होती. परंतु, आता बँकेला २ हजार रूपयांच्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने याबाबत आरबीआयला इ-मेल पाठवून विचारले असता. त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही.
नोटाबंदीपूर्वी बाजारात सुमारे १७ लाख कोटी रूपयांच्या नोटा उपलब्ध होत्या. आरबीआयच्या आकडेवारीनुसार जून २०१७ पर्यंत बाजारात सुमारे १४.५ कोटी रूपयांच्या नोटा होत्या. आरबीआयच्या आकडेवारीच्या आधारावर हिताचीने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, मे महिन्यापर्यंत १०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात सुमारे ४ लाख कोटी रूपये चलनात आहेत. तर नोटाबंदीपूर्वी १०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात सुमारे २.५ लाख कोटी रूपयांचे चलन उपलब्ध होते. तर नोटाबंदीपूर्वी ५०० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात ८.१ लाख कोटी रूपयांचे चलन होते. तर मे महिन्यापर्यंत ४.१ लाख कोटी चलनात होते.

No comments:

Post a Comment