Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, July 6, 2017

इस्रायल: समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या तंत्रज्ञानाची मेादींनी केली पाहणी



हैफा- ओल्गा बीचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गुरुवारी समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या तंत्रज्ञानाची पाहणी केली. गेल-मोबाइल डिसेलिनेशन युनिट रोज २० हजार लिटर समुद्राचे व ८० हजार लिटर सांडपाणी शुद्ध करते. दोन्ही देशांत नुकताच गंगा नदीच्या पाणी शुद्धीकरणासाठी करार झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायल दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी हैफा येथील जवानांच्या समाधी स्थळाला भेट दिली. त्यांच्यासोबत इस्रायली पीएम बेनजामीन नेतन्याहू सुद्धा आहेत. या ठिकाणी पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या 44 भारतीय जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. एका भारतीय पंतप्रधानांनी या जवानांना आदरांजली देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शहीदांना सन्मान देताना मोदी दिल्लीतील तीन मूर्ती चौकचे नाव हैफा चौक करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर पीएम मोदींनी समुद्रतटावर समुद्राच्या फिल्टर्ड पाण्याचा आस्वाद घेतला.
17 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह हैफा येथे गेले होते. मात्र, गेल्या 70 वर्षांत एकही भारतीय पंतप्रधानांनी या ठिकाणाला भेट दिली नव्हती.

No comments:

Post a Comment