Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, July 6, 2017

होमगार्डस्ची उपासमार शिवसेना थांबवणार; सहा महिने मानधनच नाही!


दिवसाला दहा-बारा तास प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यानंतरही होमगार्डस्ना सहा-सहा महिने मानधन मिळत नाही. त्यातच त्यांची सेवा अचानकपणे समाप्त करण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता शिवसेनेनेच आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे साकडेच आज होमगार्डस्नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातले. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनानेते आज अन्यायग्रस्त होमगार्डस्ना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे होमगार्डस्ची उपासमार थांबणार आहे.
शेकडो होमगार्डस्नी आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. सण, उत्सव असोत किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी पोलीस व अन्य यंत्रणांबरोबर होमगार्डस्ची मदत घेतली जाते. दहा तासांच्या डय़ुटीसाठी त्यांना ३०० रुपये मानधन दिले जाते. ते मिळण्यासही चार-सहा महिने वाट पाहावी लागते. गेल्या वर्षी गणेशोत्सवात केलेल्या बंदोबस्ताच्या कामाचा भत्ता अद्याप अनेकांना मिळालेला नाही असे बाबूराव कातकर आणि राजश्री लाखन या होमगार्डस्नी सांगितले.
२०१६ पासून सरकारने टप्प्याटप्प्याने होमगार्डस्ची सेवा समाप्त करण्यास सुरुवात केल्याने हजारो होमगार्डस्वर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. १२ वर्षे झालेल्या होमगार्डस्ची सेवा समाप्त करावी अशा २०१० च्या अध्यादेशानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जाते. जे होमगार्डस् याविरुद्ध आवाज उठवतात त्यांची सेवा आधी समाप्त केली जाते अशी माहिती कातकर यांनी दिली. २० वर्षांपेक्षाही जास्त काळ सेवा देणारे शेकडो होमगार्डस् असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्यायग्रस्त होमगार्डस्ना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेणार आहोत. त्यांच्यापुढे होमगार्डस्च्या विविध समस्यांचा पाढा वाचणार आहोत, असे यावेळी शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment