Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 25, 2017

गटारीतील तेलापासून तयार होते हॉटेलात जेवण, लोकांना मूर्ख बनवतोय चीन


चीनचा झगमगाट दाखविण्यासाठी तेथील हॉटेल व रेस्तरॉंचे जगभर उदाहरण दिले जाते. मात्र सत्य वेगळेच आहे. येथे गटारातून जमा केलेल्या तेलापासून जेवण तयार केले जाते. वास्तविक स्पेनच्या कॉमुनिदाद व्हेसेनसियानात कपडे व सौंदर्य प्रसाधनांचे 64 हजार बनावट उत्पादने पकडण्‍यात आली आहेत. हे उत्पादने चीनमधून आयात केली गेली होती. ती मोठ्या ब्रँड्सच्या नावाखाली विकली गेली होती. divyamarathi.com तुम्हाला सांगणार आहे की चीनमध्‍ये कशा पध्‍दतीने बनावटी वस्तूंची बाजारपेठ मोठी आहे. असा तेलाचा वापर केला जातो...
- चीनच्या रेस्तरॉं व हॉटेल्समध्‍ये मलनि:सारण आणि गटारातून तेल जमा करुन जेवण बनवले जाते. 
- वुहान पॉलिटेक्निक विद्यापीठाचे एक प्राध्‍यापकाने याबाबतचा खुलासा केला होता. 
- ते म्हणतात, की चीनच्या प्रत्येक 10 पैकी 1 खाद्यपदार्थ या तेलाने बनवतात. 
- यानंतर सरकारी अन्न विभागाने राष्‍ट्रीय आणीबाणीचे आदेश दिले होते.\
 चीनमध्‍ये अक्रोटचे भाव अचानक वाढले. 
- यामुळे काही लोकांना पैसा कमावण्‍याची नवीन कल्पना सूचली. 
- त्यांनी फोडलेले अक्रोट जमा करुन त्यात सिमेण्‍ट, दगड आणि कागद भरुन जोडण्‍याचा उद्योग सुरु केला. 
- बनावटी अक्रोटचा हा उद्योग चीनमध्‍ये जम बसवत आहे. 
- चीनमध्‍ये अनेक कंपन्यांनी नकली अंडी विकून पैसा कमावला. 
- ह्या कंपन्या अंडी बनवण्‍यासाठी जिलेटिनचा वापर करतात. 
- यानंतर याला खाण्‍याचा रंग दिला जातो. हे पाणी व मेणाचे मिश्रण केले जाते. 
- हे माणसासाठी जीवघेणा आहे. 
 चीनमध्‍ये दुधात मेमालाइन (एक प्रकारचे सायनाइड जे माणसासाठी घातक आहे.) टाकून विकले जाते. 
- हे टाकल्याने दूधात जसे प्रोटीन वाढल्यासारखे वाटते. 
- मात्र याने मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. 
- या दुधामुळे तीन लाख मुले आजारी पडले होते. 
- यामुळे मुत्रपिंडाला इजा झाल्याने काही मुलांचा जीव गेला होता. 
- कार्डबोर्ड बनला कार्डबोर्ड, रसायन आणि पोर्क एकत्र करुन बनवले जाते. 
- यात कास्टिक सोडा वापरला जातो. याने साबण व कागद बनवला जातो. 
- याचा एक व्हिडिओ समोर आल्याने वांदग माजला होता. यावर सरकारला स्पष्‍टीकरण द्यावे लागले होते. 
- चीनमध्‍ये बनवाटी दारुचा व्यवसाय प्रचंड फैलावलेला आहे. 
- हे अनेक प्रकारे बनवले जाते. सरकारही याबाबत चिंतित आहे. 
- बरेच लोक महागड्या बाटल्यांमध्‍ये स्वस्तातली स्वस्त दारु भरुन विकता. 
- हे लोक दारुच्या दुकानांमधून बाटल्या घेतात व त्यांच्या नावात फेरबदल करुन विकतात. 
- सरकारने नुकतेच येथे 2 हजार 149 कोटी रुपयांची बनावटी दारु पकडली गेली होती
 चीनमध्‍ये बदकाच्या रक्तापासून बनवलेला टोफूला खूप मागणी आहे. 
- बदकाला मारुन त्याचे रक्त घट्ट होई पर्यंत उकळले जाते. त्याचे बारीक तुकडे केले जातात. 
- चीनचे भ्रष्‍ट दुकानदार डक ब्लड टोफूच्या नावावर लोकांना मूर्ख बनवतात. 
- ते डुकराच्या किंवा म्हैशीच्या रक्तात धोकादायक फर्मैल्डहाइड(एक प्रकारचे वायू) टाकतात. हे डक ब्लडम्हणून विकले जाते. 
- एप्रिल 2014 मध्‍ये चिनी प्रशासनाने जिआंग्सू प्रांतात बनावटी डक ब्लड रॅकेटचा पर्दाफाश केला होता. 

क्लेनबुटेरोलला चरबी कमी करणारे पावडर असेही म्हटले जाते. चीनमध्‍ये डुकरांच्या खाण्‍यात हे टाकले जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. 
- हे जनावरांमधील चरबी कमी करते. मात्र माणसाला याने ह्दयविकार व अशक्तपणा होऊ शकतो. 
- 1980 च्या दशकात हे जनावरांना खायला टाकण्‍यास सुरुवात झाली होती. मात्र 2002 मध्‍ये आरोग्याच्या कारणास्तव यावर बंदी घातली गेली. 
- मात्र काही मटन विक्री कंपन्या हे डुकरांना खाऊ घालतात. कारण याने त्यांची चरबी कमी होते. बाजारात अशा डुकरांची किंमत जास्त असते. 
- चीनची सर्वात मोठी मीट प्रोसेसर कंपनी ' हेनान शुआंगुई इन्व्हेस्टमेण्‍ट अँड डेव्हलपमेण्‍ट' या प्रकरणात अडकलेली आहे. 

यांगचेंगचे हे खेकडे चीनमध्‍ये सर्वाधिक किंमतीने विकले जातात. ही येथे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. 
- ती यांगचेंग तलावात पकडली जातात. 
- काही दुकानदार यांगचेंग तलावातून पाणी घेऊन साधारण खेकडे काही तासांसाठी यात बुडवून ठेवतात. यामुळे ती यांगचेंग खेकड्यासारखे दिसू लागतात. 
- कैक दुकानदार साधारण खेकडे यांगचेंगसारखे दिसण्‍यासाठी रसायनांचाही वापर करतात. 
- यांगचेंग तलावातून प्रत्येक वर्षी 3 हजार टन खेकडे पकले जातात. दुसरीकडे यांगचेंग सांगून प्रत्येक वर्षी 1 लाख टन खेकडे विकले जात आहे.
- चीनमध्‍ये नकली तांदूळही बनवले जातात व ती विकतातही. 
- चीनच्या 'फेक राइस'ला प्लास्टिक तांदूळही म्हटले जाते. येथे बटाटे, बीट आणि सिंथेटिक रेझीनला तांदळासारखा आकार दिला जातो. 
- शांक्सी प्रांतात तैवानमध्‍ये हे खुलेआम विकले जाते. 
- शिजवल्यानंतर ते दगडाप्रमाणे कडक असते.
- तीन कटोरी प्लास्टिक तांदूळ खाणे म्हणजे एक बॅग वाइनिल प्लास्टिक बॅग खाण्‍यासारखे आहे. यामुळे हे आरोग्यासाठी खूप घातक आहे; 
- चिनी दुकानदार हे ख-या तांदळात मिश्रण करुन विकतात. उत्पादन खर्च कमी व फायदा जास्त असल्याने चीनमध्‍ये हा उद्योग वेगाने पसरला आहे. 
- चीनमध्‍ये प्रत्येक वर्षी 8 लाख तांदूळ उत्पादित केले जाते. 
टोफीला 'सोया दही' ही म्हटले जाते. हे चीजप्रमाणे दिसणारा खाद्यपदार्थाचा प्रकार आहे. हे सोया मिल्क व कोऐग्यलन्टने बनवले जाते. 
- डिसेंबर 2010 मध्‍ये हुबेई प्रांताताच्या वुहानमधील दोन फॅक्टरीत नकली टोफू बनवत असल्याने बंद करण्‍यात आले होते. 
- पोलिसी चौकशीत कळाले की सोया प्रोटीन, पीठ, मोसोसोडियम ग्लुटामेट आणि रंग टाकून टोफू बनवले जात होते. 
- दीर्घकाळ रसायने व स्वस्त उत्पादनांपासून बनवलेला टोफू खाल्याने कॅन्सरसारखा आजार होण्‍याची भीती असते

चीनमध्‍ये दोन प्रकारचे भेसळ केलेले मध विकले जाते. एका नैसर्गिक मधात शुगर सीरप, चुकंदर किंवा भाताचे सीरप टाकून बनवले जाते. 
- दुसरे असते बनावटी मध. हे नै‍सर्गिक मधापेक्षा अस्सल दिसते. हे पाणी, साखर आणि रंग टाकून बनवले जाते. 
- फक्त 10 युआन (100 रुपये) मध्‍ये एक किलोग्रॅम बनावटी मध बनवले जाते. बाजारपेठेत हे 60 युआनमध्‍ये विकले जाते. 

 चीनमध्‍ये खराब व किडलेल्या धान्यापासूनही तांदळाचे नूडल्य बनवले जातात. साधारणपणे असे धान्य जनावरांना खायला टाकले जाते. 
- उत्पादन अस्सल दिसावे म्हणून सल्फर डिऑक्साइडही टाकले जातात. हे शरीरासाठी खूप घातक असते. 
- चौकशीत एकट्या डोंगुआन शहरात नकली नूडल्स बनवणा-या 50 फॅक्ट-यांचे नाव समोर आले होते. येथे प्रत्येक दिवशी 5 लाख किलोग्रॅम नूडल्स बनवले होते.

चिनी खाद्यपदार्थ विकेते मटनही विकतात. 
- येथे उंदरं, मुंगूस आणि कोल्ह्यांचे मांस मटन म्हणून विकले जाते. 
- उंदरं, कोल्हे आणि इतर जनावरांचे मांसात नायट्रेट, जिलेटिन आणि लाल रंग टाकून विकले जाते. 
- 2013 मध्‍ये पोलिसांनी नकली मटन विक्री प्रकरणी तीन महिन्यांत 900 पेक्षा जास्त लोकांना अटक केले होते. या वेळी 20 हजार टनांपेक्षा जास्त नकली मटन जप्त करण्‍यात आले होते. 
- चिनी पोलिसांनी सोशल नेटवर्किंग साइट बीवोवर नकली व असली मटनात फरक कळावे यासाठी ट्युटोरियल व्हिडिओही पोस्ट केले आहे. 
- मात्र यात फरक करणे सोपे नाही.


No comments:

Post a Comment