नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 व्या मन की बात मध्ये रविवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाऊस आणि जीएसटीवर आपले मनोगत व्यक्त केले. जीएसटीवर पंतप्रधानांना लोकांचे काही पत्र आले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकांचा व्यापाऱ्यांवर विश्वास वाढला असा दावा मोदींनी केला आहे. तसेच पावसावर बोलताना सरकार पूरग्रस्तांची पूर्णपणे मदत करत आहे. यासोबतच, सर्वच देशवासियांनी न्यू इंडियाचा संकल्प घ्यावा. सगळे एकत्रित येऊन हे स्वप्न 5 वर्षांत पूर्ण करू असे मोदींनी सांगितले आहे.
- "पावसाळा हा लोकांचे मन मोहणारा ऋतू आहे. कधी-कधी पावसाचे रौद्र रूप सुद्धा पाहायला मिळते. निसर्गाचा हा रूप पाहून निराशा देखील होते."
- "गेल्या काही दिवसांपासून गुजरात, राजस्थान आणि ईशान्य भारतासह पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. सरकार पूरग्रस्तांना पूर्णपणे मदत करत आहे."
- "लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान लोकांना सुखरूप बाहेर काढणे आणि इतरत्र हलवण्याचे काम करत आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी पीक विमा योजनेसाठी आम्ही कंपन्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत."
- "हेल्पलाईन नंबरवर फोन करून शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. हवमानाचा अंदाज जवळपास खरा निघत आहे. हे सर्व काही अंतराळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे."
- जीएसटीमुळे व्यापाऱ्यांवर ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीतून खऱ्या अर्थाने संघराज्य शासन पद्धती दिसून आली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

No comments:
Post a Comment