Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, August 17, 2017

16 वर्षाच्या मुलाने केले व्हेलचे तुकडे, फोटोज समोर येताच माजली खळबळ


अलास्कातील यूपिक गावात एका 16 वर्षाच्या मुलाने व्हेलचे केलेले शिकार प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. खरं तर गेल्या एप्रिल महिन्यात ख्रिस अपासिन्गॉकने किना-यावर पोहचलेल्या एका व्हेल माशाला आपल्या हापरून गनने मारले होते. यानंतर गाववाल्याच्या मदतीने त्या व्हेलला किना-यावर आणले गेले. ज्यानंतर गाववाल्यांनी त्या व्हेलचे अनेक दिवस मांस खाल्ले. क्रिसने फक्त व्हेलची शिकारच केली नाही तर व्हेलचे मांस कापण्यासाठी लोकांना मदत केली होती. आता मिळतेय जीवे मारण्याची धमकी....
- ख्रिसची आई सूसन आकापकने व्हेलच्या डेड बॉडीसमवेत आपले फोटोज काढत सोशल मिडियात शेयर केले होते.
- सूसनने मुलाचे फोटोज शेयर करत लिहले की, माझ्या मुलाने सा-या गावाच्या जेवणाची व्यवस्था केली.
- यानंतर हे फोटोज व्हायरल होत गेले आणि लोकांच्या निशाण्यावर ख्रिसच आला.
- एवढेच नव्हे तर, व्हेलला मारून खाल्ल्यामुळे काही लोकांनी ख्रिसला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
- ख्रिसच्या आईच्या माहितीनुसार, या धमकीमुळे मागील काही दिवसापासून ख्रिस शाळेत जात नाहीये.
- याबाबत ख्रिसच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, यात काहीही चुकीचे नाही. आम्ही लोक अशा भागात राहतो जेथे खाण्या-पिण्याची साधने खूपच सीमित आहेत. त्यामुळे सामान्यपणे आम्ही मासे आणि प्राणी- पशुंची शिकार करतो ज्यामुळे अनेक लोकांचे पोट भरते. येथे नेहमीच व्हेल माशाची शिकार केली जात असते.

ख्रिसच्या आईने फोटोज केले डिलीट-
- वाद पेटताच ख्रिसच्या आई सूसनने फेसबुकवर आपल्या मुलाचे शेयर केलेले फोटोज डिलीट करून टाकले.
- मात्र, हे फोटोज खूपच मोठ्या प्रमाणात शेयर केल्याने मीडियातही चर्चेचा विषय ठरले आहेत.
- ख्रिसच्या आईने एका पोस्टमध्ये लिहले की, तिचा मुलगा हुशारच नाही तर बहादुर सुद्धा आहे.

No comments:

Post a Comment