Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, August 16, 2017

16 वर्षाच्या तरूणीच्या प्रेमात पडले होते 40 वर्षाचे जिना, मित्राचीच होती मुलगी



मोहम्‍मद अली जिना यांना पाकिस्‍तानचे संस्‍थापक मानले जाते. त्यामुळे त्यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटले जाते. मात्र त्‍यांच्‍या हट्टामुळे अखंड भारताचे तीन तुकडे झाल्याचे भारतात मानले जाते. पाकिस्तानने 14 ऑगस्ट रोजी तर भारताने 15 ऑगस्ट रोजी आपापले स्वतंत्र दिन साजरे केले. आज या वृत्तात आम्ही तुम्हाला पाकिस्तानचे संस्थापक व राष्ट्रपिता जिना यांच्या प्रेमकहानीबद्दल माहिती देणार आहोत. गुजराती होते जिना....
- जिनांचे वडील कराचीला जाण्यापूर्वी काठेवाड या गुजरातच्या प्रांतात होते. जिनाभाई पूंजा व मिठीबाई हे त्यांचे वडील व आई! वडील एक सधन व्यापारी होते आणि काठेवाडमध्ये त्यांचा दबदबा होता. म्हणजेच जिनांना गुजरातीही म्हणता येईल. 
- जिनांच्या आजोबांनी इस्लाम धर्म स्वीकारला. पण, पणजोबा व त्यापूर्वीचे सर्व जण हिंदू (भाटिया राजपूत) होते. 
- इस्लाममधील त्यांचा पंथ खोजा. म्हणजे ते शिया होते. खोजा साधारणपणे व्यापारातच बस्तान ठेवून असल्यामुळे आजही पाकिस्‍तानातील हजारो मुस्‍लीम व्‍यापा-यांची मातृभाषा ही गुजराती आहे. कारण त्यांचेही पूर्वज गुजरातमध्येच होते.
- जिना यांचे शिक्षण वेगवेगळ्या शाळेत झाले. सुरुवातील ते कराचीच्‍या सिंध मदरसा-ऊल-इस्लाममध्‍ये शिकले. नंतर त्‍यांच्‍या वडिलांनी गोकुळदास तेज प्राथमिक विद्यालयात त्‍यांचे नाव घातले. 
- काही काळ शिक्षणानिमित्‍त ते मुंबईतही राहिले. त्‍यानंतर ख्रिश्‍चन मिशनरी स्कूल कराची येथे त्‍यांनी प्रवेश घेतला. मुंबई बोर्डातून त्‍यांनी मॅट्रिक पास केली.
- जिना यांची मातृभाषा गुजराती होती. ते धार्मिक नव्‍हते. इस्लाम वा अन्य कोणत्याही धर्माचा अभ्यास करण्‍याच्या तसे फंदात पडले नाहीत. 
- ते नमाजही पढत नसत, मशिदीत जात नसत आणि कुराणही वाचत नसत. त्यांना अरबी भाषाही येत नव्हत्या. पुढे त्‍यांनी कच्छी, सिंधी आणि इंग्रेजी, उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्‍व मिळवले.
मुंबईतील सर्वांत सुंदर तुरुणीवर त्‍यांचा जीव जडला. एवढेच नाही तर पाकिस्‍तानचे संस्‍थापक असलेल्‍या हा नेता पहिल्‍याच भेटीत तिला आपले हृदय देऊन बसला होते. रतनबाई ऊर्फ रती असे त्‍या सौंदर्यवतीचे नाव आहे.

No comments:

Post a Comment