Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, August 1, 2017

लग्झरी लाईफसाठी ओळखले जातात शरीफ, 1700 एकरांत अलिशान पॅलेस


पनामा पेपर लीक प्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टाचा मिर्णय येताच पाकिस्तानचे नवाज शरीफ (67) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात नवाझ शरीफ यांना दोषी धरले. शरीफ पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत राजकीय नेता आहेत. ही माहिती निवडणूक आयोगात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राततून समोर आली होती. नवाज शरीफ यांनी 2015 मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 2 अब्ज रुपयेची वैयक्तिक संपत्ती आहे. तर, 2011 मध्ये त्यांची संपत्ती 16.6 कोटी रुपये इतकी होती. असा आहे नवाझ शरीफ यांचा रायविंड पॅलेस....

- लाहोरच्या रायविंडजवळ जट्टी उमरा परिसारत हा आलिशान बंगला आहे.
- नवाझ यांचे रायविंड पॅलेस सुमारे 1700 एकर परिसरात पसरले आहे. तर नुसता पॅलेस तब्बल 300 एकरात उभारला आहे.
- यात एक भव्य पॅलेस असून आजूबाजूला मोठमोठ्या बागा आहेत.
- रॉयल रेसिडंटमध्ये 3 ड्रॉईंग रुम आणि स्विमिंग पूल आहेत.
- नवाझ यांची आई, पत्नी आणि मुलगी यांच्या प्रवेशासाठी खास गेट आहे.
- पाकिस्तानमधील सर्वांत मोठ्या आणि आलिशान बंगल्यांमध्ये नवाझ यांच्या बंगल्याचा समावेश होतो.
- या बंगल्या प्रत्येक प्रवेशद्वारा शेजारी सिंहांचे पुतळे बसविण्यात आले आहेत.

लग्झरी लाईफ जगतात नवाझ-
- नवाझ शरीफ पाकिस्तानचे असे पहिले नेता आहेत जे तीन वेळा पंतप्रधान बनले आहेत.
- राजकीय करियरसोबतच लग्झरी लाईफस्टाईलसाठी नवाज यांना ओळखले जाते.
- ते देशातील सर्वात श्रीमंत पाचव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत.
- त्यांची एकून संपत्ती 1.4 बिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,886 कोटी रुपये आहे.
- याशिवाय नवाज यांच्याकडे अनेक प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. ते अनेक साखर कारखान्यांचे मालिक आहे.
- तसेच एका स्टील कंपनीचे ते संस्थापक सुद्धा आहेत. त्यांचे वडिलही उद्योगपती होते.

No comments:

Post a Comment