Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, August 16, 2017

या कम्यूनिस्ट हुकुमशहाने आपल्या सत्ताकाळात 35 हजार तरुणींशी ठेवले होते संबंध

 
क्युबा क्रांतीचे प्रणेते व तब्बल पाच दशके अमेरिकी सत्तेला मेटाकुटीस आणणारे क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचा 13 ऑगस्ट रोजी जन्म दिवस होता. 1959 मध्ये क्रांती करून अमेरिकेचे चमचे फुल्गेंकियो बतिस्ता यांची हुकुमशही सत्ता हटवत त्यांनी सत्ता काबीज केली होती. त्यांना कम्युनिस्ट क्यूबाचे जनक मानले जाते. त्यांच्या आयुष्याबाबत अनेक किस्से प्रसिद्ध राहिले. त्यांच्यावर बनलेल्या एका डॉक्युमेंट्रीत खुलासा करण्यात आला की, कॅस्ट्रो यांनी 82 व्या वर्षापर्यंत सुमारे 35,000 महिलांशी शारीरिक संबंध बनवले होते. कॅस्ट्रो यांनी दावा केला होता की, त्यांच्यावर 634 वेळा हत्या करण्याचा कट रचला गेला. 35,000 महिलांशी ठेवले संबंध....

- क्यूबाचे क्रांतीकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांनी वयाच्या 82 व्या वर्षापर्यंत सुमारे 35,000 महिलांशी संबंध बनवले होते. 
- याबाबतचा दावा त्यांच्यावर बनविण्यात आलेल्या एका डॉक्युमेंट्रीत करण्यात आला आहे.
- न्ययॉर्क पोस्टने कॅस्ट्रो यांच्या माजी अधिका-याच्या हवाल्याने सांगितले होते की, फिडेल दररोज किमान दोन महिलांशी सेक्स करायचे.
- हा प्रकार सुमारे चार दशके सुरु होता.
फिडेलचा प्रवास; श्रीमंत घरात जन्म, युवा तेजतर्रार वकील ते राष्ट्राध्यक्ष-
 
- क्रांतीच्या आझी फिडेल कॅस्ट्रो एक युवा वकील होते, ज्यांना खूपच कमी लोक ओळखायचे.
- त्यांचा जन्म 1926 मध्ये क्यूबामधील फिडेल अलेजांद्रो कॅस्ट्रो परिवारात झाला, जो परिवार खूपच श्रीमंत होता.
- क्रांती घडण्याआधी ते हुकुमशहाच्या विरोधात 1952 च्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र मतदान होण्याआधीच ते बंद करण्यात आले.
फिडेल कॅस्‍ट्रोंचा अल्प परिचय?

- डिसेंबर 1959 ते फेब्रुवारी 2008 पर्यंत ते क्‍युबाचे राष्‍ट्रपती होते.
- त्‍यांच्‍यापूर्वी फुल्गेंकियो बाटिस्टा या हुकूमशाची क्‍युबावर सत्‍ता होती.
- फिडेल कॅस्‍ट्रो यांनी लॉची पदवी प्राप्‍त केल्‍यानंतर 1952 मध्‍ये हुकूमशाह बाटिस्टा विरुद्ध निवडणूक लढवली.
- परंतु, बाटिस्टाने मतदान न घेताच स्‍वत:ला विजयी घोषित केले.
- त्‍यानंतर फिडेल कॅस्‍ट्रो याने हुकूमशाहविरुद्ध आंदोलन सुरू केले.
- 26 जुलै 1953 रोजी त्‍यांनी आपल्‍या 100 साथिदारांसह सँटियागो डी क्युबामधील सैनिक बॅरकवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला.
- यात त्‍यांच्‍या साथिदारांना अटक झाली. पण, फि‍डेल आणि त्‍यांचे भाऊ राउल पळून जाण्‍यात यशस्‍वी झाले.
- त्‍यानंतर त्‍यांनी '26 जुलै मूव्‍हमेंट' नावाची संघटना स्‍थापन केली.
- त्‍या माध्‍यमातून देशभरातून तरुणांचे संघटन बांधून कम्युनिस्ट पार्टीची स्‍थापना केली आणि 1959 मध्‍ये हुकूमशाह बाटिस्टाची सत्‍ता उलथवून लावली.
 क्यूबाचा क्रांतीकारी नेता फिडेल कॅस्ट्रो यांच्यासंबंधित इंटरेस्टिंग फॅक्ट्स...
फिडेलचा प्रवास; श्रीमंत घरात जन्म, युवा तेजतर्रार वकील ते राष्ट्राध्यक्ष-
 
- क्रांतीच्या आझी फिडेल कॅस्ट्रो एक युवा वकील होते, ज्यांना खूपच कमी लोक ओळखायचे.
- त्यांचा जन्म 1926 मध्ये क्यूबामधील फिडेल अलेजांद्रो कॅस्ट्रो परिवारात झाला, जो परिवार खूपच श्रीमंत होता.
- क्रांती घडण्याआधी ते हुकुमशहाच्या विरोधात 1952 च्या निवडणुकीत उभे राहिले. मात्र मतदान होण्याआधीच ते बंद करण्यात आले.
- लोकक्रांती करण्यासाठी 26 जुलै रोजी फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्या 100 सहका-यांसह सॅंटियागो डी क्यूबात सैनिकी बॅरेकवर हल्ला केला. मात्र, त्यात यश आले नाही.
- या हल्ल्यात त्यांचे काही सहकारी मारले गेले मात्र फिडेल कॅस्ट्रो आणि त्याचा भाऊ राउल वाचले. काहींना जेलमध्ये टाकले गेले. 
- त्यानंतरही फिडेल कॅस्ट्रो बतिस्ता शासनाविरोधात आंदोलन सुरुच ठेवले.
- हे अभियान त्यांनी मेक्सिकोमध्ये निर्वासित जीवन जगत सुरु ठेवले. तेथे त्यांनी एक छापामार संघटन बनवले.
- ज्याला त्यांनी '26 जुलै मूव्हमेंट' नाव दिले. कॅस्ट्रो यांच्या क्रांतीकारी आंदोलनाला क्यूबात खूप समर्थन मिळू लागले.
- 1959 मध्ये त्यांच्या संघटनेने बतिस्ता यांचे सरकार उखडून फेकले व सत्ता काबीज करत पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष बनले.
- आता क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो आहेत.
- कॅस्ट्रो यांच्या क्रांतीकारी आदर्शांसमवेतच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील बाबी पुढे जगभर चर्चेल्या गेल्या.
रोज लागत होत्‍या दोन नवीन महिला....
 
फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्‍या एकहाती सत्‍तेचा गैरफायदा घेतला. या काळात त्‍यांना  सतत 40 वर्षांपर्यंत रोज कमीत-कमी दोन नव-नवीन महिला लागत होत्‍या. दुपारचे आणि रात्री जेवण झाल्‍यानंतर ते त्‍यांच्‍यासोबत सेक्‍स करत. दरम्‍यान, बऱ्याच वेळा सकाळच्‍या ब्रेकफास्‍टनंतरही त्‍यांना महिला लागे.

अमेरिकेवर करणार होते अण्विक हल्‍ला...
 
> फिडेल यांनी अमेरिकेवर आण्विक हल्‍ला करण्‍याची योजना आखली होती.
> त्‍यासाठी अण्विक शस्‍त्रेही सज्‍ज केली होती.
> 1959 ते 2008 पर्यंत फिडेल हे क्‍युबाचे एकमेक राष्‍ट्रपती होते.
> याच काळात अमेरिकत 11 राष्‍ट्रपती झाले.

अमेरिकेला आणले होते जेरीस....
 
> फिडेल कॅस्‍ट्रो सत्‍तेत येण्‍यापूर्वी क्‍युबाची ओळख ही अमेरिकेच्‍या ओंजळीणे पाणी पिणारे राष्‍ट्र अशीच होती.
> साम्‍यवाद राजवट असलेले क्‍युबा हे पहिले पाश्मिमात्‍य राष्‍ट्र बनले.
> परंतु, फि‍डेल यांनी दाखवलेले साम्‍यवादाचे स्‍वप्‍न दीर्घकाळ टिकले नाही.
> फिडेल हेसुद्धा हुकूशाही मार्गानेच चालले.
> फिडेल यांनी सत्‍तेत येताच क्‍युबामधील अमेरिकेच्‍या सर्व कंपन्‍यांचे राष्‍ट्रीयकरण करून उघड-उघड वैर घेतले.
 

फिडेल यांनी भावाकडे सूत्रं सोपवून दिला पदाचा राजीनामा...
 
> वर्ष 2008 मध्‍ये फिडेल यांनी आपल्‍या राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि भावाकडे या पदाची सूत्रे सोपवली.
> मात्र, मृत्यू होईपर्यंत फिडेल हेच कम्‍युनिस्‍ट पार्टीचे राष्‍ट्रीय सचिव होते.
साम्यवादी तुफान
 
फिडेल कॅस्ट्रो हे आंतरराष्ट्रीय राजकारणात उठलेले तुफान होते. या तुफानाची साम्यवादावर अविचल निष्ठा होती. याच निष्ठेच्या बळावर उद्दाम अमेरिकेला आव्हान देण्याचे धाडस आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे साहस या तुफानाने अंगी बाळगले होते...

स्वातंत्र्यासाठी तंत्र्यासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल सामान्य माणसाच्या मनात आदरच नव्हे, तर उत्कट प्रेम असते. हे प्रेम तरुणांना अधिक आकर्षित करणारे आणि रोमॅन्टिकही असते. म्हणूनच बेचाळीसच्या लढ्यात तुरुंगात गेलेल्या नेत्यांपेक्षाही, मोडतोडीच्या मार्गाने भूमिगत चळवळ चालवणाऱ्या जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली आदी नेत्यांबद्दल जनमानसात उचंबळणारे प्रेम जास्त होते, हेही दिसले आहे. जिवाचा धोका पत्करणाऱ्यांबद्दलचे हे प्रेम तरुणांना अधिक आकर्षित करणारे आणि रोमॅन्टिकही असते.

जेव्हा भारताचे स्वातंत्र्य स्थिर होऊन एक दशक लोटले होते, त्या काळात भारतापासून दूर अमेरिकेच्या दक्षिणेकडे असलेल्या एक छोट्या बेटात सशस्त्र क्रांतीने उलथापालथ झाली होती. एक कोटीहून थोडी अधिक लोकसंख्या असलेल्या क्यूबा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशातली फ्लेगेंन्शियो बॅटिस्टा या हुकूमशहाची राजवट उलथून तेथे फिडेल कॅस्ट्रो या तरुण नेत्याच्या नेतृत्वाखाली नवीन राजवट प्रस्थापित झाली होती. क्यूबामध्ये तोवर वेगवेगळ्या हुकूमशहांचेच राज्य अस्तित्वात होते. अगदी टेलिफोन कंपनीपासून साखर उद्योगापर्यंत सगळ्या अार्थिक नाड्या अमेरिकन कंपन्यांच्या हातात होत्या, त्यामुळे हुकूमशहा आपल्या जनतेशी कसेही वागो, तो अमेरिकेला अनुकूल असला पाहिजे, एवढेच सूत्र तेव्हाही अमेरिकन धोरणात होते. क्यूबा देशात प्रचंड गरिबी होती. स्पेनची साम्राज्यसत्ता क्यूबावर दीर्घकाळ होती. स्पेनमधून आलेल्या अनेकांनी क्यूबामध्ये व्यापार आणि उद्योग करून सरकारची मर्जी राखत श्रीमंती मिळवली होती. अशाच एका कुटुंबात जन्मलेल्या फिडेल कॅस्ट्रोने इतिहास घडवला होता.

वस्तुत: फिडेल कॅस्ट्रोने क्यूबात केलेली क्रांती ही त्या काळाशी सुसंगत नव्हती. तो प्रवाहाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न होता. साठचे दशक सुरू होण्यापूर्वीच अाफ्रिकेतील अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली होती. जगभर पाश्चात्त्य पद्धतीच्या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेला मान्यता मिळत होती. शस्त्रांच्या साह्याने साम्यवाद पसरवण्याचा प्रयत्न थंडावला होता. १९४८-४९च्या सुमारास आपल्याही देशात तेलंगणमध्ये झालेला असा प्रयोग फसला होता. थोड्याच काळाने सोव्हिएत युनियनचा राष्ट्राध्यक्ष क्रुश्चेव्हने साम्यवादी अाणि भांडवलशाहीवादी यांनी शांततेचे सहजीवन जगावे, अशी इच्छा घोषित केली होती. या संक्रमण काळात पश्चिमेकडे क्यूबातील क्रांतीमुळे साम्यवादी विचारांचा ध्वज रोवला गेला होता.

अमेरिका हे सगळे शांतपणे पाहणे अशक्य होते. क्यूबातली नवी राजवट उलथून पडावी म्हणून हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात आले होते. क्यूबातून कॅस्ट्रोची कम्युनिस्ट हुकूमशाही मान्य नसलेल्या अनेक क्यूबन नागरिकांनी अवघ्या ९० मैलावर असलेल्या अमेरिकेचा आश्रय घेतला होता. अशा लोकांत खुद्द फिडेल कॅस्ट्रोची बहीण आाणि मुलगी यांचाही समावेश होता. या स्थलांतरितांपैकी १४०० लोकांनी अमेरिकन पाठिंब्याने क्यूबाच्या किनाऱ्यावर चालही केली. पण हा बेत फसला. खुद्द फिडेल कॅस्ट्रो यांची हत्या करण्याचे ६००हून अधिक वेळा प्रयत्न झाले.

क्यूबातल्या राजवटीतले काही विशेष होते. क्यूबातल्या साखर उद्योगाबरोबर वाढलेला व्यवसाय म्हणजे, तेथील कॅसिनो किंवा द्यूतगृहे. कॅस्ट्रोने अशा कॅसिनोमध्ये झालेल्या फायद्यांपैकी ६० टक्के रक्कम सरकारच्या समाजकल्याण कार्यक्रमासाठी देण्याचा हुकूम दिला होता. घरांची भाडी कमी करण्यात आली. विजेचे दर कमी करण्यात आले. जमीनदारांची जमीन कुळांना वाटून देण्यात आली. त्यात अमेरिकेला पाठिंबा देणाऱ्या जमीनदारांचीही जमीन गेली. मात्र कॅस्ट्रो क्रांतीच्या मार्गाने वाटचाल करत होता, तेव्हा त्याला कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा नव्हता. क्रांतीनंतरसुद्धा कॅस्ट्रो अणि कम्युनिस्ट यांनी प्रारंभी परस्परावंर जोरदार टीका केली होती. पण नंतर क्यूबा आणि रशिया यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. क्यूबाने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला मान्यता दिली आणि आपले अस्तित्वच नष्ट करू पाहणाऱ्या अमेरिकेबरोबरचे राजनैतिक संबधही तोडले.

क्यूबाच्या या क्रांतीगाथेत कॅस्ट्रोला एक अतिशय महत्त्वाचा सहकारी मिळाला. तो होता मूळचा अर्जेन्टिनाचा चे गव्हारा. आपले सरकार स्थापन झाल्यावर कॅस्ट्रोने गव्हारावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. पण एका देशात राहून राज्यकारभार करणे हा त्याचा स्वभावच नव्हता. लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्ये क्रांतीचे लोण पसरवावे व तेथे भांडवलशाहीला अनकूल असलेल्या राजवटी नष्ट कराव्यात, याची त्याला मनोमन आस होती. १९६५मध्ये त्याने मंत्रीपद सोडले. तो अगोदर आफ्रिकेत गेला, तेथे कांगोमधल्या बंडखोरांना मदत करण्याचे आश्वासन त्याने दिले. परंतु तेथील अनुभव फारसा उत्साहजनक नव्हता. त्यानंतर तो बोलेव्हियात आला, तेथे सरकारविरोधी क्रांतीच्या प्रयत्नात पकडला गेल्यानंतर त्याला गाेळ्या घालून मारण्यात आले. क्रांतीची कोणतीही फळे चाखण्याचा मोह बाजूला सारून जगभर श्रमिकांचे राज्य यावे, यासाठी लढणारा चे-गव्हारा हा बरीच दशके क्रांतिकारक विचारांचे व निर्भय कृतीचे प्रतीक म्हणून तरुणांच्या मनात आहे.

त्यातूनच कॅस्ट्रोविषयी जगभर आकर्षण निर्माण झाले, जे आजही कायम आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, अमेरिकेसारखा एक शेजारी बलाढ्य देश सत्ता नष्ट करण्यासाठी सतत प्रयत्न करत असताना कॅस्ट्रोने निर्भयपणे त्याला तोंड दिले. क्यूबाचे स्वातंत्र्य कायम राखले. हे खरे आहे की, कॅस्ट्रोची सत्ता ही गरिबांचे हित पाहणारी असली तरी ती हुकूमशाहीच होती. नागरिक हक्कांचे जे दमन अशा राजवटीत अपरिहार्यपणे होते, ते क्यूबातही झाले होते. म्हणूनच हजारो क्यूबन नागरिकांनी देशाबाहेर आश्रय घेतला अणि कॅस्ट्रोच्या मृत्यूची बातमी येताच मियामीच्या रस्त्यावर क्यूबाचेच ध्वज हाती घेऊन अानंदाने जल्लोशही केला. अर्थात केवळ धाक आणि जुलूम यांच्या साह्याने राज्य करता येते, पण जनतेचा पाठिंबा आणि प्रेम मिळवता येत नाही. कॅस्ट्रो आजारपणामुळे निवृत्त होईपर्यंत आपल्या देशात विलक्षण लोकप्रिय होता. त्याची भाषणे व वचने ही प्रेरणास्रोत मानली जात होती.

१९६२च्या ऑक्टोबर महिन्यात ज्या वेळी आपण चिनी आक्रमणाचा प्रतिकार करत होतो, त्याच वेळी सर्व जगाचा श्वास रोखणारे एक नाट्य क्यूबन भूमीवरही घडत होते. अमेरिकेने इटली आणि तुर्कस्तानमध्ये काही क्षेपणास्त्रे आणून ठेवली होती. त्यांचे स्वाभाविक लक्ष्य सोव्हिएट रशिया होते. त्याला उत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या जवळसुद्धा अशीच क्षेपणास्त्रे आपणही आणून ठेवावीत, असा सोव्हिएट रशियाने विचार केला. कॅस्ट्रोला ही योजना स्वागतार्ह वाटली आणि त्याने मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे क्यूबामध्ये लावू दिली. आपल्या किनाऱ्यापासून १००-१२५ किमीच्या आत अण्वस्त्र वाहू शकणारी रशियन क्षेपणास्त्रे येऊन पोहोचताच, अमेरिका अस्वस्थ झाली. अमेरिकन हेर विमानांनी या क्षेपणास्त्रांची छायाचित्रे घेतली. राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांनी ही क्षेपणास्त्रे तत्काळ हटवण्याची मागणी केली. आता पुढे काय होणार? या शंकेने जग चिंतेत पडले होते. तेरा दिवस हा तणाव कायम होता. पुढे केनडी आणि क्रुश्चेव्ह यांच्यात पस्परांनी लावलेली ही क्षेपणास्त्रे काढून घेण्याचे ठरले. युद्धाच्या काठापर्यत आलेल्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला. हा संघर्ष वाढलाच असता, तर त्याची झळ क्यूबालाच प्रथम बसणार होती, पण फिडेल कॅस्ट्रो शांतपणे या शक्यतेला तोंड देत होता.

जवळजवळ ४९ वर्षे कॅस्ट्रोने राज्य केले. आठ वर्षापूर्वी आपली प्रकृती बिघडल्यामुळे त्याने आपल्या भावाच्या हातात सूत्रे दिली. अणि त्या भावाने -राऊल याने आठ वर्षे फिडेलच्याच धोरणाने आणि मार्गाने ही सत्ता पुढे चालवली. आश्चर्य असे की, रशिया, चीन अणि व्हिएतनाम यांनी भांडवलशाही व्यवस्थेचा काही भाग स्वीकारला, बाजारपेठीय अर्थशास्त्र स्वीकारले आणि नव्या जागतिक अर्थव्यवस्थेत ते सहभागी झाले. क्यूबात असे काहीच झाले नाही. क्यूबा स्वत:ला कम्युनिस्ट म्हणवत राहिला. सामुदायिक मालकीला प्राधान्य देणारे आणि मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध करणारे भांडवलशाही विरोधी धोरण अवलंबित राहिला. हे तो कसे करू शकला? याचे एक उत्तर म्हणजे, आपल्या तत्त्वज्ञानावरची कॅस्ट्रोची अविचल निष्ठा हे आहे. अशा निष्ठेला आंधळीसुद्धा म्हणता येईल. परंतु हे छोटेसे भौगोलिक आणि राजकीय बेट अार्थिक परिवर्तनाच्या काळातही वादळांना तोंड देत, साम्यवादाचा उद‌‌्घोष करत राहिले.

स्वत:ला जाहीरपणे कम्युनिस्ट म्हणवणारा कॅस्ट्रो हा नॉन अलाइन्ड मुव्हमेन्टच्या (NAM) सहाव्या परिषदेचा अध्यक्ष होता. सातवी परिषद बगदादला भरणार होती, परंतु त्या वेळी इराक-इराण युद्ध चालू असल्यामुळे ती भारतात भरवता येईल काय? अशी विचारणा कॅस्ट्रोने इंदिरा गांधींकडे केली आणि ही परिषद भारतामध्ये भरली. इंदिरा गांधी यांना तर तो माझी बहीण असेच संबोधत असे. नेहरू कुटुंबातील जवाहरलाल, इंदिराबाई आणि राजीव गांधी या तीन पिढ्यांशी त्याचे उत्तम संबंध होते. युनोच्या एका बैठकीसाठी तो प्रथमच अमेरिकेत गेला असताना, त्याच्या हॉटेलमध्ये जाऊन नेहरू त्याला भेटले, याचे त्याला खूपच अप्रूप वाटले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना तो भारतात आला होता आणि नंतर राजीव गांधीही क्यूबाच्या राजधानीत हवानाला गेले होते. राजकारणाच्या सोयीसाठी सर्व राष्ट्रप्रमुखांशी संबंध चांगले ठेवावेच लागतात. परंतु कॅस्ट्रोविषयी जे विशेष ममत्व जवाहरलाल यांना आणि नंतर इंदिराबाईंना वाटत होते, त्याचे कारण तो कम्युनिस्ट होता, यापेक्षा बलाढ्य राजसत्तेशी टक्कर घेत आपले स्वत्व राखणारा साहसी नेता होता. देशात कॅस्ट्रोने केलेल्या अार्थिक सुधारणांपैकी काही नेहरूंना आवडल्या असतील, मात्र त्याने स्वीकारलेली हुकूमशाहीची पद्धत त्यांना खचितच मान्य नव्हती. तरीही त्यांच्या मनातली आपुलकी कायम होती व ती संघर्षाला समोरे जाणाऱ्या कॅस्ट्रोच्या धाडसी स्वभावाबद्दलची होती.

कॅस्ट्रोच्या मनाचा ताठरपणा शेवटपर्यंत कायम होता. बराक ओबामांनी क्यूबाशी चाळीस वर्षांपूर्वी तोडून टाकण्यात आलेले राजनैतिक संबंध पुन्हा जोडले. परस्परांच्या देशात वकिलातीही सुरू झाल्या. याच वर्षी ओबामा स्वत: क्यूबाला जाऊन आले. पण तरीही कॅस्ट्रोच्या मनातली अमेरिकेबद्दलची कटूता संपलेली नव्हती. अमेरिकेपासून क्यूबाला काही नकोय, असे त्याने नंतर लिहिलेल्या एका पत्रात म्हटले होते. अगोदर कम्युनिस्ट पक्षाशी संबंध नसलेला कॅस्ट्रो अमेरिकेच्या धोरणामुळे कम्युनिस्ट गटाला जवळ करू लागला आणि अमेरिकेला तो अधिक अप्रिय झाला.

एकीकडे दळवळणाची साधने, नवनवे वैज्ञानिक शोध, नव्या व्यवस्थांचा स्वीकार करण्याची तयारी, यामुळे जगाचे राजकारण बदलते आहे. जागतिक राजकारणात कुणी अस्पृश्य राहलेले नाही. म्हणून जग जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे आपण मानत होतो. पण अलीकडील काळात विरुद्ध दिशेने वाहणारे वारेही अस्तित्व दाखवू लागले आहे. ब्रिटनमध्ये युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने लोकांनी कौल दिला. अमेरिकेमध्ये ‘अमेरिका फर्स्ट’ या घोषणेचा (स्वदेशी हिताला प्राधान्य) ट्रम्प यांच्या विजयात वाटा होता. ‘आपल्यापुरते पाहा’ हा नवा मंत्र जगाला आवडत चालला असेल, तर क्यूबातील राजवट पुन्हा आपल्या कोशात बंद होणार की तेथील जनता हुकूमशाहीला आणि एकलकोंडेपणाला कंटाळून मुक्ततेचा मार्ग स्वीकारणार? असा प्रश्नही या क्षणी उपस्थित होत आहे. जवळजवळ अर्धशतक देशाचे नेतृत्व करणारा कॅस्ट्रो आता काळाच्या पडद्याआड गेला आहे, तरीही क्यूबासमोरचे प्रश्न शिल्लक आहेतच. पण तरीही त्याच्या आणि चे-गव्हेरा यांच्या अतुलनीय शौर्याच्या कथा पुन:पुन्हा सांगितल्या जाणार आहेत. कोणत्याही व्यवस्थेखाली माणूस भरडून जाऊ नये, यासाठी कॅस्ट्रोच्या शौर्याची आणि निष्ठेची आठवण करावी लागणार आहे, भलेही त्याचा मार्ग आपल्याला पूर्णपणे अमान्य असला तरीही!
रोज लागत होत्‍या दोन नवीन महिला....
 
फिडेल कॅस्ट्रो यांनी आपल्‍या एकहाती सत्‍तेचा गैरफायदा घेतला. या काळात त्‍यांना  सतत 40 वर्षांपर्यंत रोज कमीत-कमी दोन नव-नवीन महिला लागत होत्‍या. दुपारचे आणि रात्री जेवण झाल्‍यानंतर ते त्‍यांच्‍यासोबत सेक्‍स करत. दरम्‍यान, बऱ्याच वेळा सकाळच्‍या ब्रेकफास्‍टनंतरही त्‍यांना महिला लागे.
अमेरिकेला आणले होते जेरीस....
 
> फिडेल कॅस्‍ट्रो सत्‍तेत येण्‍यापूर्वी क्‍युबाची ओळख ही अमेरिकेच्‍या ओंजळीणे पाणी पिणारे राष्‍ट्र अशीच होती.
> साम्‍यवाद राजवट असलेले क्‍युबा हे पहिले पाश्मिमात्‍य राष्‍ट्र बनले.
> परंतु, फि‍डेल यांनी दाखवलेले साम्‍यवादाचे स्‍वप्‍न दीर्घकाळ टिकले नाही.
> फिडेल हेसुद्धा हुकूशाही मार्गानेच चालले.
> फिडेल यांनी सत्‍तेत येताच क्‍युबामधील अमेरिकेच्‍या सर्व कंपन्‍यांचे राष्‍ट्रीयकरण 
साम्यवादी तुफान
 
फिडेल कॅस्ट्रो हे आंतरराष्ट्रीय राजकारणात उठलेले तुफान होते. या तुफानाची साम्यवादावर अविचल निष्ठा होती. याच निष्ठेच्या बळावर उद्दाम अमेरिकेला आव्हान देण्याचे धाडस आणि ते प्रत्यक्षात आणण्याचे साहस या तुफानाने अंगी बाळगले होते...

स्वातंत्र्यासाठी तंत्र्यासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांबद्दल सामान्य माणसाच्या मनात आदरच नव्हे, तर उत्कट प्रेम असते. हे प्रेम तरुणांना अधिक आकर्षित करणारे आणि रोमॅन्टिकही असते


No comments:

Post a Comment