Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, August 2, 2017

71,400 मुलींचा विवाह लावून देण्यासाठी यूपी सरकारचा पुढाकार, रोखीबरोबर भांडीकुंडी


लखनऊ -उत्तर प्रदेशात गरीब मुलींचा विवाह उत्तर प्रदेश सरकार लावून देणार आहे. राज्य सरकारच्या खर्चानेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात खासदारांव्यतिरिक्त समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. सरकारने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या २० हजार रुपयांच्या रकमेत कपात केेलेली नाही. ही रक्कम वधूच्या खात्यात जमा केली जाईल. त्याचबरोबर एक स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात येणार आहे.
समाजकल्याण विभागाने यासंबंधात प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवला आहे. जिल्हाधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक असतील. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या पहिल्या टप्प्यात ७१,४०० मुलींचे लग्न लावून देण्यात येणार आहे.
रोखीबरोबर भांडीकुंडी
समिती मंडप, विवाह विधी इत्यादीची साेय करेल. लग्नात सरकार ३५ हजार रुपये खर्च करणार आहे. यात मुलीला २० हजार रुपये तिच्या खात्यात देण्यात येतील. दहा हजारांचे कपडे, काही दागिने, सात भांडी आणि स्मार्टफोन देण्यात येईल. पाच हजार रुपये मंडपासाठी दिले जातील.

No comments:

Post a Comment